वाशित महाराष्ट्र विकास आघाडी पक्षाची कार्यकर्ता पदाधिकारी आढावा बैठक संपन्न
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
(अनंतराज गायकवाड प्रतिनिधी) : सर्वसामान्यांच्या हक्काची लढाई लढण्यासाठी “नवे पर्व दलित मुस्लिम ओबीसी सर्व” चा नारा देत संस्थापक अध्यक्ष अण्णाराव पाटील यांच्या आदेशाला अनुसरून महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष एडवोकेट मा. नंदेश आंबेडकर, प्रदेश महासचिव एडवोकेट अनिरुद्ध येसाळे, प्रदेश संघटक मा. बालाजी अर्जुने यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई प्रभारी मा. मल्लिकार्जुन पुजारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ता आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांना लक्षात घेऊन वोटर आयडी बनवणे, असंघटित कामगारांसाठी श्रम कार्ड, हेल्थ कार्ड बनवणे, असंघटित कामगारांना मार्गदर्शन करणे, पक्ष वाढवणे, सामान्य लोकांचे प्रश्न सोडवून मार्गदर्शन करणे यासाठी मोहीम राबवणे इत्यादी विषयांवर मा. नंदेश आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना सखोल मार्गदर्शन केले. वॉटर मीटर गटर च्या समस्या सोडवून सामान्य लोकांसाठी कार्यकर्ता तत्परतेने धावून गेला पाहिजे असे प्रतिपादन एडवोकेट अनिरुद्ध येसाळे यांनी केले. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून ईडी लावून तुरुंगात पाठविण्याच्या नादात सामान्य जनतेच्या समस्या प्रस्थापित पक्ष बाजूला सारत आहेत. अशा राजकारणाला जनता कंटाळली आहे, अशा काळात महाराष्ट्र विकास आघाडी पक्ष एक सेक्युलर भूमिका घेऊन सामान्यजनांचे प्रश्न हाताळणार आहे असा ठाम विश्वास मा. बालाजी अर्जुने यांनी व्यक्त केला.
याशिवाय नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना पक्षात सामील करून पदी नियुक्ती पत्र देण्यात आले. यासमयी राजेंद्र सुळ, ज्ञानदेव कंडमगिरे, किरण खोशे, राजूभाई थार, माधुरीताई भुयार, अलकाताई दहेकर, रामदास महानवार, तबस्सुम नेर, नीलमताई साद, शंकर पाटील, विजय पवार यांच्यासह मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण-डोंबिवली, उरण येथील पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शपतुला सिद्दिकी पालघर, विश्वजीत गायकवाड कल्याण, सचिन कोरलेकर माहीम, नौशाद गजगे मुंब्रा, फईन खान कळवा-मुंब्रा, खैरूनिसा इब्राहिम ऐरोली, मुरलीधर सिंदगी तुर्भे नवी मुंबई, श्यामलाताई मगर, संजीवनीताई गायकवाड उरण, रूपालीताई देशपांडे, वर्षाताई वावाडे, गोरख घाडगे ऐरोली यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला.
या कार्यक्रमात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन व सूत्रसंचालन मा. धर्मेंद्र रेड्डी यांनी आपल्या खास शैलीत केले.
प्रतिक्रिया :
“आयाराम गयाराम नेत्यांना पक्षामध्ये स्थान नाही व नवख्या उमेदवारांना पक्षाच्या ध्येय धोरणाच्या जोरावर जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी महापालिकेत निवडून आणून पाठवेल. कारण आमचा पक्ष स्वतःला वाघ म्हणून घेणाऱ्या धर्मांधांचा नाही, स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या व जातीचे राजकारण करणाऱ्या नेत्यांचा नाही हा पक्ष दलित, मुस्लिम, ओबीसी या सर्वांचा असून त्यांच्या न्याय हक्कासाठी लढण्यास सज्ज झाला आहे व येत्या निवडणुकीत त्याचे सकारात्मक पडसाद उमटतील व दोन अंकी नगरसेवक निवडून येतील.” – प्रदेश उपाध्यक्ष मल्लिकार्जुन पुजारी.