नवी मुंबई

नवी मुंबईतील पत्रकारांचा किल्ले प्रतापगड अभ्यास दौरा संपन्न

संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)

नवी मुंबई : जर्नालिस्ट वेलफेअर असोसिएशन, नवी मुंबईच्यावतीने “एक दिवस गड-किल्ल्यांसाठी, आपला इतिहास जोपासण्यासाठी” या उपक्रमांतर्गत पत्रकारांची किल्ले भेट आणि पुरातन धार्मिक स्थळांच्या भेटीचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य आणि त्यांच्या पराक्रमाची यशोगाथा सांगणाऱ्या प्रतापगडाला भेट, त्यानंतर पुरातन श्री क्षेत्र महाबळेश्वर, पंचगंगा देवस्थान माहिती घेत दर्शन घेतले. पाचगणी येथील भिलार गावातील देशातील पहिलं अनोख्या पुस्तकांच्या गावाला पत्रकारांनी भेट दिली. किल्ले प्रतापगडाचा पराक्रमी इतिहास, सह्याद्रीच्या डोंगररांगाची अभ्यासपूर्ण माहिती आनंद उतेकर यांनी विशद केली.

जर्नालिस्ट वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार अशोक शेशवरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित दोन दिवसीय अभ्यास दौऱ्यात जेष्ठ पत्रकार गुरुवर्य विश्वरथ नायर यांनी संभाषणात मार्गदर्शन करताना प्रतापगड आणि शिवकालीन इतिहास जागा केला. सदर दौऱ्याची सुरुवात सीबीडी येथून करण्यात आली. नैना बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश बाविस्कर, माजी नगरसेवक अशोक गुरखे यांनी भगवा ध्वज फडकावत नवी मुंबईतील पत्रकारांना शुभेच्छा दिल्या. असोसिएशनच्या माध्यमातून किल्ले भेट या अस्मिता जपणाऱ्या उपयुक्त कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल अध्यक्ष अशोक शेशवरे आणि सर्व पत्रकारांचे आपल्या भाषणात कौतुक करत बाविस्कर यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना असोसिएशनचे अध्यक्ष अशोक शेशवरे म्हणाले की, गत वर्षी शिवप्रेमींचे शक्तिस्थान असणाऱ्या ऐतिहासिक किल्ले रायगडाला भेट दिली होती. यावेळी किल्ले प्रतापगड भेटीचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्राच्या मातीचा कणा आणि अस्मिता असणाऱ्या शिवकालीन गड किल्ल्यांची माहिती नवोदित पत्रकारांना मिळावी, या गड-किल्ल्याच्या भेटीतून किल्ले संवर्धन करण्यासाठी पत्रकारांच्या संकल्पना शासनापर्यंत पोहोचाव्यात याकरिता अभ्यास दौऱ्याच आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पाचगणी भिलार प्रमाणे स्वच्छ सुंदर शहर म्हणून ओळखला जाणाऱ्या नवी मुंबई शहरात नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून प्रायोगिक तत्त्वावर पुस्तकांचे नवी मुंबई शहर निर्माण करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे अध्यक्ष शेशवरे यांनी सांगितले. या अभ्यास दौऱ्यास महाबळेश्वर येथील प्रसिद्ध बिल्डर रमेश ढेबे, भगवान ढेबे यांनी मोलाचे सहकार्य केले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button