नवी मुंबई

पहिली ते चौथी हे वर्ग ऑनलाईन पद्धतीने घेण्याची रिपब्लिकन पक्षाची मागणी

(अनंतराज गायकवाड) राज्य सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे नवी मुंबईतील अनेक शाळांनी अचानक पालकांना समाजमध्यामातून कळवल्यामुळे पालकांची तारांबळ उडाली आहे. वय वर्ष पाच ते पंधरा वर्षाच्या विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले नाही तरी शिक्षण संस्था अशा विद्यार्थ्यांना शाळेत येण्याबाबत सक्ती करत आहे.

या मनमानी निर्णयाचा रिपब्लिकन पक्ष (आठवले) ने विरोध केला असून नवी मुंबईतील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवी चे वर्ग आणि परीक्षा ऑनलाईन पद्धतीनेच सुरू ठेवावे, न.मुं.म.पा.ने अद्याप शाळांबाबत आदेश दिले नसताना मनमानी कारभार करणाऱ्या शिक्षण संस्थांना समज देऊन योग्य ती कारवाई करावी.

वाशीतील सेंट मेरी शाळेशेजारीच महानगर पालिकेचे भव्य रुग्णालय असून सदर शाळा सुटण्याच्या वेळेला सदर परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून यामुळे रुग्णांना त्रास होत आहे. या वाहतूक कोंडीमुळे गंभीर रुग्ण वाटेतच दगावण्याची शक्यता आहे तरी सदर शाळेने याबाबत योग्य ती काळजी घ्यावी व तशी सूचना महानगरपालिकेने शाळा व्यवस्थापनाला द्यावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे (आठवले) नवी मुंबई सरचिटणीस एल. आर. गायकवाड, युवक आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष नारायण मोरे आणि आयटी सेलचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सचिन कटारे यांनी शिक्षण विभागाकडे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button