मनसे पुरस्कृत स्वराज्य प्रतिष्ठान मित्र मंडळ तुर्भे आयोजित शिवजयंती उत्सव संपन्न
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर्फे तुर्भे स्टोअर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव व हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरा झाला. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून मनसे सरचिटणीस महाराष्ट्र राज्य सौ. शालिनी ताई ठाकरे उपस्थित होत्या.
यावेळी उपस्थित ४०० ते ५०० विधवा माता भगिनी ह्यांना साडी वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला. कोव्हीड १९ काळात तुर्भे स्टोअर विभागातील नागरिकांसाठी जे डॉक्टर उपलब्ध होते त्यांचा ह्यावेळी कोव्हीड योद्धा सन्मान करण्यात आला.
यावेळी नवी मुंबई महिला शहर अध्यक्ष सौ. अनिता नेटके नायडू, यशोदा ताई महिला उपशहर अध्यक्ष, लीला पारखे ताई महिला विभाग अध्यक्ष नेरुळ व इतर महिला पदाधिकारी तसेच नवी मुंबईचे शहर अध्यक्ष श्री. गजानन काळे, शहर सचिव श्री. विलास घोणे, सागर नाईकरे, संतोष खांडगे सर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
आयोजक श्री. चंद्रकांत मंजुळकर विभाग अध्यक्ष तुर्भे, नवी मुंबई ह्यांनी ह्या कार्यक्रमास खास मेहनत घेतली होती.