नवी मुंबई
युगनिर्माते प्रतिष्ठान आयोजित शिवजयंती निमित्त भव्य रक्तदान शिबीर संपन्न – वाशी तालुका (ब्लॉक) काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष सौ. दर्शना भोईर ह्यांची उपस्थिती
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
दिनांक २० फेब्रुवारी रोजी साहिल हाइट्स, सेक्टर १५अ, बेलापूर किल्ले गावठाण, किल्ले बेलापूर जवळ सकाळी ९.०० ते दुपारी २.०० पर्यंत भव्य रक्तदान शिबीर आयोजित केले गेले. ह्या शिबिराला श्री गोवर्धनी माता सेवा मंडळ ह्यांचे विशेष सहकार्य लाभले. ह्या शिबिराला लोकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. ह्या शिबिरात जमा झालेले रक्त नवी मुंबई महानगर पालिकेच्या माँसाहेब मीनाताई ठाकरे रक्तपेढी मध्ये संकलित केले.
या शिबिराला सेक्टर ११, जुहूगाव च्या समाजसेविका तसेच वाशी तालुका (ब्लॉक) काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष सौ. दर्शना भोईर ह्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी सौ. दर्शना भोईर ह्यांच्या शुभहस्ते उपस्थित रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.