तेजस्व करिअर अकॅडमी तर्फे शिवजयंती निमित्त दुचाकी रॅलीचे आयोजन
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
(अनंतराज गायकवाड) महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाले यांच्या आदेशानुसार घणसोलीतील तेजस्व करिअर ॲकॅडमी चे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष निलेश ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली शिवजयंती निमित्त पोलीस व सैनिक प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसह मोटर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शिवप्रतिमेचे पूजन करून विद्यार्थ्यांना छत्रपतींची युद्ध नीती, रणनीती, शारीरिक जडण-घडण खेळाचे महत्व, उत्तम शासन, व्यवस्थापन या विषयांवर अकॅडमीचे संचालक अक्षय आव्हाड यांनी सखोल मार्गदर्शन केले. शिवाजी महाराजांचे विचार अंगीकृत करून जीवनात यशस्वी होण्याचा मूलमंत्र निलेश ढाकणे यांनी आपल्या भाषणातून देऊन विद्यार्थ्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
अकॅडमीतील शेकडो विद्यार्थ्यांनी आवर्जून या कार्यक्रमासाठी हजेरी लावली होती. मोटार सायकलींवर भगवे झेंडे व मुलींनी पारंपारिक नऊवारी साडी परिधान करत भगवे फेटे बांधून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.