घणसोलीत विविध ठिकाणी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
(अनंतराज गायकवाड) कपाळावर चंद्रकोर लावून दाढी वाढवून महाराजांसारखे आपण दिसू शकतो परंतु महाराजांचे विचार आचरणात आणण्यासाठी कठीण परिश्रम व अनुशासनाची गरज आजच्या पिढीला आहे. रिपब्लिकन सेना सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशानुसार सालाबाद प्रमाणे तळवली नाका, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्याचप्रमाणे घणसोली विभागातील खापरी बाबा चाळ, श्री स्वामी समर्थ चाळ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी रिपब्लिकन सेना नवी मुंबई जिल्हा प्रमुख खाजामिया ऐरोली विधानसभा प्रमुख प्रकाश वानखेडे, नवी मुंबई महिला प्रमुख रेखाताई इंगळे यांनी शिवचरित्रावर प्रकाश टाकला.
खापरी बाबा घणसोली महिला प्रमुख संगीता वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली व श्री स्वामी समर्थ चाळ येथे जागृती साळवी व जया जाधव यांच्या नेत्रत्वात शिवपुजन करून कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास नवचैतन्य फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र लादे, युवा जिल्हाप्रमुख सुनील वानखेडे, शाहीर अरुण साळवे यांच्यासह भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल,रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते, स्थानिक रहिवासी महिला, बालके, ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.