वाशी अतिक्रमण विभागांतर्गत एक दिवसाची कारवाई; परत जैसे थे वैसे
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
वाशी सेक्टर १७, गोल्डन पंजाब हॉटेल च्या बाजूस लागून असलेल्या सर्व कार असेसरीज दुकानांचे (कारसाठी नवीन लावण्यात येणारी असेसरीज) काम समोरील पदपथ तसेच रोडवर वर बिंधासपणे कित्येक वर्षे चालू आहे. फक्त सोमवारी दुकाने बंद असल्या कारणाने त्या रोडवर वाहतूक श्वास घेते. बाकीचे दिवसामध्ये पदपथ वर काम चालू असतेच परंतु रोड वर सिंगल लाईन तसेच डबल लाईन मध्ये कार पार्क करून कामे केली जातात. सोमवार सोडून इतर दिवशी त्या रोडवरून वाहतूक करणे म्हणजे कसरत करण्यासारखे असते. कित्येक वेळी भांडणे सुद्धा होतात. ह्या ठिकाणी नेहमीच हॉर्न वाजवले जात असल्याने आजूबाजूच्या राहणाऱ्या लोकांना त्याचा त्रास होतो.
मी पहिल्यांदाच येथे कारवाई होताना पाहिली. लोकांना दाखवण्यापुरती कारवाई आहे का ? असा प्रश्न पडतो. मी फोटो काढताना अतिक्रमण अधिकाऱ्याला विचारले कि अशा ठिकाणी कारवाई होते का? त्यांनी सांगितले कि नेहमीच होत असते कारवाई. तर मला प्रश्न पडतो कि कारवाई होत असेल तर मग नेहमीच डबल लाईन मध्ये येथे कार ची कामे कशी होतात?
नवी मुंबई मधील सेक्टर १७ हा पॉश एरिया म्हणून ओळखला जातो मग येथे पार्किंग व वाहतुकीचा त्रास लोकांना का सहन करावा लागतो? ह्याला जबाबदार कोण? प्रशासन कि पोलीस यंत्रणा?