राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथी उत्साहात साजरी; वाशी तालुका (ब्लॉक) काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष सौ. दर्शना भोईर ह्यांचे विनम्र अभिवादन
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
आज दिनांक ३०/१/२०२२ रोजी संध्याकाळी ५.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी येथे राष्ट्रपीता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन सभा, नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अनिलजी कौशिक साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते, सर्व तालुका अध्यक्ष व पदाधिकारी, अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष व पदाधिकारी, महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा व पदाधिकारी, सेवा दलाचे अध्यक्ष व पदाधिकारी, तसेच सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी सेक्टर ११, जुहूगाव च्या समाजसेविका तसेच वाशी तालुका (ब्लॉक) काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष सौ. दर्शना भोईर ह्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी ह्यांच्या फोटोला विनम्र अभिवादन केले.
यावेळी समई भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.