नवी मुंबई
ऐरोली विभागातील अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील जी विभाग ऐरोली अंतर्गत सेक्टर 19 व 20, ऐरोली रेल्वे स्थानक तसेच यादवनगर ऐरोली येथे अनधिकृतपणे रस्ते व फुटपाथवर तसेच व्यवसाय सुरु होते.
या अनधिकृत फेरीवाल्यावंर विभागामार्फत फेरीवाला हटाव मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले असून, 01 टेम्पो, 02 हातगाडी, 1 पाणीपुरी काऊंटर, नाशीवंत भाजीपाला व इतर सामान जप्त करण्यात आले असून कोपरखैरणे येथील क्षेपणभूमी येथे जमा करण्यात आले. या धडक मोहिमेसाठी 03 मजूर, 1 पिकअप व्हॅन कारवाई करीता वापरण्यात आले. सदरच्या कारवाईकरीता जी विभाग ऐरोली कार्यालयातील अतिक्रमण अधिकारी/कर्मचारी, अतिक्रमण विभागातील पोलिस पथक व आणि सुरक्षारक्षक यांचेमार्फत करण्यात आली.
यापुढे देखील अशा प्रकारे कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.