तळवली नाका येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
(प्रतिनिधी: अनंतराज गायकवाड) घणसोली येथील तळवली नाका आंबेडकर चौक येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानातील उद्देशिकेचे वाचन करून ध्वजारोहण करताच समता सैनिक दलाच्या वतीने सलामी देऊन भारतीय तिरंग्याला उपस्थितांसह शिस्तबद्ध पद्धतीने मोठ्या दिमाखात मानवंदना देण्यात आली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधान पुस्तिकेचे पूजन करून प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.
रिपब्लिकन सेना सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशाला अनुसरून रिपब्लिकन सेना ऐरोली विधानसभा प्रमुख मा. प्रकाश वानखडे यांच्या नेतृत्वात अनुक्रमे आंबेडकर चौक येथे ज्येष्ठ नागरिक नामदेव शिवशरण व छत्रपती शिवाजी नगर जेष्ठ नागरिक गजानन जाधव यांच्या हस्ते स्थानिक रहिवाशांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे दलित पॅंथर ऑफ इंडियाचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष विजय अवसरमोल, माजी पोलीस उपनिरीक्षक उत्तम रोकडे, वरिष्ठ नेते बाळासाहेब संगारे, रिपब्लिकन सेना युवा अध्यक्ष सुनील वानखडे, तळवली विभाग प्रमुख सचिन जाधव यांना आमंत्रित करण्यात आले होते.
या समयी मान्यवरांनी भारतीय संविधान या विषयावर थोडक्यात परंतु मोलाचे मार्गदर्शन केले. यानंतर मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यासह कृष्णा वाघमारे, शालिग्राम मोरे, पंडित वानखडे, रवींद्र वानखेडे, चौरे साहेब यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष सहकार्य केले. दरम्यान उपस्थितांना अल्पोपहार चे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी शाहीर अरुण साळवे यांनी आभार प्रदर्शन करत कार्यक्रमाची सांगता केली.