नेरुळ येथे ‘वस्तीसभा’ संपन्न; गोरगरीब वस्ती धारकांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
“जो जमीन सरकारी है, वो जमीन हमारी है” चा नारा देत नवी मुंबईतील नेरूळ पूर्व रमेश मेटल खाण आंबेडकर नगर येथे ‘वस्तीसभा’ पार पडली. झोपडीधारकांना उपस्थित मान्यवरांनी एस आर ए अंतर्गत मूलभूत सुविधा, सरकारच्या योजना, झोपडपट्टीवासीयांसाठी निघालेले जीआर याबाबत येथील रहिवाशांना मार्गदर्शन केले.
या सभेत रिपब्लिकन सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांचे खंदे शिलेदार जिल्हा प्रमुख मा. खाजमिया पटेल, घर हक्क संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष माननीय हिरामण पगार, महाराष्ट्र हॉकर्स फेडरेशन च्या अध्यक्षा मा. विनिताताई बाळेकुंद्री, कामगार एकता युनियनचे राजू वंजारे, एडवोकेट सुजित निकाळजे, सामाजिक कार्यकर्ते अशोक सूर्यवंशी आदी मान्यवरांनी गोरगरीब वस्तीतील नागरिकांना एकत्र येऊन कमिटी स्थापन करण्याचे आवाहन केले व भविष्यात कोणतीही अडचण आल्यास कायदेशीर लढा देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत असे आश्वासन दिले.
येणाऱ्या काळात सातत्याने आशा वस्ती सभांचे आयोजन केले जाईल व लोकांच्या समस्या सोडवल्या जातील. या सभेचे आयोजन प्रकाश वाकोडे, पंडित चोरमारे यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते. या सभेकरिता आंबेडकर नगर परिसरातील आजूबाजूच्या वस्तीतील प्रतिनिधींसह स्थानिक रहिवाशांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. कार्यक्रमाच्या शेवटी रिपब्लिकन सेना ऐरोली विधानसभा प्रमुख मा प्रकाश वानखडे यांनी आभार प्रदर्शन केले. या सभेत महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.