नवी मुंबई स्वच्छता अभियान च्या नावाखाली लोकांच्या पैशांची वाट
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
नवी मुंबई स्वच्छता अभियान दरम्यान नवी मुंबई महानगरपालिका करोडो रुपयाचा खर्च करत असते पण तो खर्च किती वायफळ होत असतो याची प्रचीती प्रत्येक नवी मुंबई च्या जनतेने अनुभवलेली आहे. प्रत्येक वर्षी स्वच्छता अभियान दरम्यान नवीन टेंडर्स काढून नवी मुंबई महानगर पालिकेची तिजोरी खाली करत असतात. कुठल्याही कामाचा दर्जा आणि मटेरियल याची योग्य तपासणी नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी करत नाहीत. याचे कारण कंत्राटदार आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे भ्रष्ट अधिकारी यांचे टक्केवारीच्या आर्थिक गणित ठरलेला असतो.
बोनकोडे कोपरखैरणे सेक्टर बारा मध्ये डीवाईडर ला रंग लावण्याचे काम चालू आहे. कंत्राटदार आणि कुठल्याही कुशल कामगारांच्या हातून काम न करून घेता डीवाईडर ची साफसफाई न करता धुली माती वरच निकृष्ट दर्जाचे रंग वापरून रंग लावण्याचं काम करत आहेत . सदर कामाचा दर्जा तपासण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका यांचा एकही अधिकारी किंवा संबंधित कंत्राटदार उपस्थित राहत नाहीत.
तरी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी त्वरित याबाबत संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी ही विनंती दिव्यादीप फाउंडेशनचे नवी मुंबई अध्यक्ष श्री. प्रदीप नामदेव म्हात्रे (बोनकोडे गाव) ह्यांनी केली आहे.