घणसोली व ऐरोली विभागातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील जी विभाग ऐरोली अंतर्गत सेक्टर 09, 16, 19 व 20 तसेच यादवनगर ऐरोली येथे अनधिकृतपणे रस्ते व फुटपाथवर तसेच रेस्टॉरंटच्या बाहेर समासी जागेत सिगारेट / पान टपरी यांचे व्यवसाय सुरु होते.
या अनधिकृत सिगारेट / पान विक्रेत्यांवर विभागामार्फत पानटपरी हटाव मोहिमेचे आयोजन करण्यात होते. या कारवाईमध्ये रेस्टॉरंटच्या समासी जागेतील 02 स्टील काऊंटर, 08 पानटपरी काऊंटर, 03 हातगाडी, नाशीवंत भाजापाला व इतर सामान जप्त करण्यात आले असून कोपरखैरणे येथील क्षेपणभूमी येथे जमा करण्यात आले. या धडक मोहिमेसाठी 08 मजूर, 3 पिकअप व्हॅन कारवाई करीता वापरण्यात आले. सदरच्या कारवाईकरीता जी विभाग ऐरोली कार्यालयातील अतिक्रमण अधिकारी/कर्मचारी, अतिक्रमण विभागातील पोलिस पथक व आणि सुरक्षारक्षक यांचेमार्फत करण्यात आली.
त्याचप्रमाणे घणसोली विभाग कार्यक्षेत्रातील सत्यवान नगर, गोठिवली या ठिकाणी आर सी सी जोत्याचे बांधकाम प्रगतीपथावर होते तसेच सितारामवाडी सार्वजनिक शौचालया जवळ घणसोली गांव, याठिकाणी तळमजला आरसीसी स्लॅबचे काम पूर्ण असल्याचे निदर्शनास आले होते. या दोघांनी नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही पूर्व परवानगी न घेता अनधिकृत बांधकाम सुरू केले होते. सदरील अनधिकृत बांधकमांस घणसोली विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजाविण्यात आलेली होती. संबधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविणे आवश्यक होते. परंतू त्यांनी सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरू ठेवले होते.
सदर दोन्ही अनधिकृत बांधकामावर घणसोली विभागामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार दोनही अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आलेली आहेत. धडक मोहिमेसाठी घणसोली विभागातील अधिकारी / कर्मचारी, मजुर-11, जेसीबी-1, ब्रेकर-2, कटर-1 तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलीस पथक तैनात होते.
यापूढे देखील अशाप्रकारे कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.