नवी मुंबई

फॅशन जगतात नवी मुंबईचे नाव उंचावणारा फॅशन डिझायनर अनिसदिन

संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)

(नवी मुंबई) नवी मुंबईला फॅशन हब बनवण्याच्या उद्दिष्टाने नवी मुंबई फॅशन विक ची सुरुवात करून नवी मुंबई सुद्धा फॅशनमध्ये कमी नाही. ही गोष्ट सिद्ध करणारा सेलिब्रिटी फॅशन डिझायनर अनिसदिन हा फॅशन जगतात आपले नाव कमवत आहे. गेली कित्येक वर्ष वाशीमध्ये अनिसदिन लेबल या द्वारे बॉलीवूड तसेच सुप्रसिद्ध कलाकारांना फॅशनेबल कपडे तो डिझाईन करतो.

विशेष म्हणजे घरातून कशाच प्रकारचे सहकार्य नसताना त्याने आपली वाट निवडत स्वतःला सिद्ध केले. आता नवी मुंबईत नव्हे तर मुंबईत सुद्धा त्याचा डिझाईन स्टुडिओ आहे.

“या क्षेत्रामध्ये अनिश्चितता असते त्यामुळे सातत्याने नाविन्यपूर्ण काहीतरी करावे लागते. हे सर्व करतांना जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेला तोंड देत आपल्या कपड्यांच्या डिझाईन नेहमीच अपडेट असावे लागतात.”असे अनिसदिन सांगतो.

नवी मुंबई ही त्याची जन्मभूमी आहे आणि नवी मुंबईमध्ये तो एकमेव असा फॅशन डिझायनर आहे ज्याला मनापासून वाटतं की नवी मुंबई हे फॅशनची राजधानी व्हावी. त्यांनी डिझाईन केलेले कपडे हे कान्स फिल्म फेस्टिवल, हॉलिवूड तसेच बॉलिवूड सेलिब्रिटींनी परिधान केले आहे. यामध्ये अभिनेत्री सोनम कपूरच नाव नमूद करणे गरजेचे आहे. फॅशन ही नेहमी समाजाशी निगडित असते ते एक समाजाचं प्रतिबिंब असतं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button