अतिक्रमण विभागामार्फत अनधिकृत स्टॉल व फेरीवाल्यांवर कारवाई
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील कोपरखैरणे विभागांतर्गत अतिक्रमण मोहिमेतंर्गत शिळफाटा रोड येथील 2 लोखंडी नीरा स्टॉल, महापे एम.आय.डी.सी. रोडवरील 2 हातगाडया, श्रमिक नगर येथील 5 हातगाडया, पावणेगाव येथील 4 हातगाडया, महापे रोड येथील 1 हातगाडी, महापे ट्रॅफिक चौकी समोरील 1 लोखंडी पान टपरी, खैरणे से.12डी येथील मार्जिनल स्पेस कारवाई करून 1 लोखंडी पान टपरी तसेच अंदाजे 68 फेरीवाले यांचे विरूध्द कारवाई करून त्यांचे भाजीपाला/फळे व इतर सामान जप्त करून कोपरखैरणे डपिंग येथे जमा करण्यात आले.
सदर कारवाई करतेवेळी या धडक मोहिमेसाठी कोपरखैरणे विभागाकडील अधिकारी/कर्मचारी, 06 मजूर, 01 गॅस कटर, 02 ब्रेकर, 1 पीकअप व्हॅन तसेच अतिक्रमण विभागाकडील मोठे वाहन व अतिक्रमण विभागाकडील पोलिस पथक तैनात होते.
यापुढे देखील अशा प्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.