वाशी व कोपरखैरणे विभागातील अनधिकृत बांधकामांवर कडक कारवाई
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील वाशी विभाग अंतर्गत भुखंड क्र-17, सेक्टर -28, वाशी येथे तळ मजल्यावर सामासिक जागेत वाढीव अनधिकृत बांधकाम केलेले होते. या बांधकामास नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही पुर्व परवानगी न घेता अनाधिकृतपणे बांधकाम केले होते. या अनधिकृत बांधकामास वाशी विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ मधील कलम ५3 (1) अन्वये नोटीस बजावण्यात आलेली होती. परंतु त्यांनी सदर ठिकाणचे अनधिकृत बांधकाम काढण्यात आले नव्हते.
त्यामुळे या अनधिकृत बांधकामावर वाशी विभाग कार्यालयामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करून अनाधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. या धडक मोहिमेसाठी वाशी विभागाकडील अधिकारी / कर्मचारी, 15 मजूर, 1 जेसीबी , 4 घन /हातोडे यांच्या सहाय्याने निष्कासित करण्यात आले.
त्याचप्रमाणे कोपरखैरणे विभाग अंतर्गत रूम नं.212, सेक्टर-1, कोपरखैरणे व रूम नं.1213, सेक्टर-12/D ,खैरणे /बोनकोडे, कोपरखैरणे, नवी मुंबई येथे महानगरपालिकेची कोणतीही पुर्व परवानगी न घेता अनधिकृतरित्या बांधकाम चालू असल्यामुळे कोपरखैरणे विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजावण्यात आलेली होती, परंतु सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम चालू होते.
या दोन्ही अनधिकृत बांधकामांवर कोपरखैरणे विभागामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करून करण्यात आलेले अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली. या धडक मोहिमांसाठी कोपरखैरणे विभागाकडील अधिकारी/कर्मचारी, एकूण 14 मजूर, 01 गॅस कटर, 03 ब्रेकर, 2 पीकअप व्हॅन तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलिस पथक तैनात होते.
यापुढे देखील अशा प्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.