मल्हार युवा प्रतिष्ठान आयोजित; ओमकार प्रीमियर लीग {सिझन १} संपन्न
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
मल्हार युवा प्रतिष्ठान तर्फे दिनांक २६ व २७ डिसेंबर रोजी ओमकार अपार्टमेंट ओनर्स असोसिएशन, सेक्टर १५, वाशी येथे ओमकार प्रीमियर लीग {सिझन १} आयोजित करण्यात आली होती. मल्हार युवा प्रतिष्ठान तर्फे वर्षाला ओमकार सोसायटी मध्ये वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम राबिवले जातात.
सदर स्पर्धेमध्ये एकूण चार संघ होते तसेच प्रत्येक संघामध्ये प्रत्येकी आठ खेळाडू ठेवण्यात आले होते. मुख्यतः हे सर्व खेळाडू ओमकार सोसायटी मधील मुले होती.
संघाचे नाव: अंशुल ८, संघ मालक सुनील तावडे {कर्णधार – प्रतिक पाटील}, मुंबई इंडियन्स, संघ मालक दीपक कांबळे {कर्णधार – योगेश निर्मल}, ग्रेट वॉरियर्सचे, संघ मालक पप्पू भंडारी {कर्णधार – समीर राणे}, चिमा 8, संघ मालक प्रताप भालेराव {कर्णधार – रोहन ओव्हाळ}
दिनांक २६ रोजी ओमकार प्रीमियर लीग २०२१ चे उद्घाटन माजी नगरसेवक प्रकाश मोरे, माजी नगरसेविका शिल्पा मोरे, सामाजिक कार्यकर्ते विजय वाळुंज तसेच अजय वाळुंज, फ्युचर फर्स्ट अकॅडेमिचे संस्थापक अभय वाघमारे ह्यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
दिनांक २७ रोजी बक्षीस समारंभ नवी मुंबई महानगरपालिका माजी आरोग्य सभापती विक्रम शिंदे, वाशी तालुका अध्यक्ष सचिन नाईक, शिवसेना विभाग प्रमुख दर्शन भणगे ह्यांच्या शुभहस्ते पार पडला.
ओमकार प्रीमियर लीग सिझन १ मध्ये अंशुल ८ ह्या संघाने बाजी मारून, ओमकार प्रीमियर लीग सिझन १ आपल्या नावावर केला. विजयी संघ मालक सुनील तावडे ह्यांना मानक चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
ओमकार प्रीमियर लीग सिझन १ मध्ये मालिकावीर म्हणून प्रतीक पाटील, सर्वोत्तम फलंदाज म्हणून अथर्व घाग, सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून ओम चौरसिया ह्यांना मान्यवरांच्या हस्ते चषक देण्यात आले.