तुर्भे विभागातील अनधिकृत बांधकामावर व अनधिकृत झोपड्यांवर धडक कारवाई
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील तुर्भे विभागांतर्गत मालमत्ताधारक, साईबाबा मंदिरा जवळ, कोपरीगांव, नवी मुंबई या ठिकाणी महानगरपालिकेची कोणतीही पुर्व परवानगी न घेता 2 आर.सी.सी. प्लींथचे बांधकाम सुरु होते.
सदर दोन्ही अनधिकृत बांधकामास महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, 1966 चे कलम 54 अन्वये नोटीस बजावण्यात आलेल्या होत्या. परंतु, सदर ठिकाणी अनधिकृत बांधकामे सुरुच होती. सदर अनधिकृत बांधकामावर तुर्भे विभाग कार्यालयामार्फत तोडक कारवाईच्या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेअंतर्गत सदर 2 अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आलेली आहेत.
तसेच एसटीपी जवळ से. 20, सानपाडा, नवी मुंबई येथील 60 झोपडया, सोनखार सब स्टेशन, से. 20, सानपाडा, नवी मुंबई येथील 10 झोपडया व शिवदर्शन सोसायटी समोर, से.16, सानपाडा, येथील 02 झोपडया अशा एकुण 72 अनधिकृत झोपडया हटविण्यात आलेल्या आहेत.
सदर मोहिमेसाठी तुर्भे विभागातील अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते. तसेच अतिक्रमण निर्मुलन पथकातील पोलीस अधिकारी/अंमलदार तैनात होते.
या मोहिमेकरीता 12 मजुर, 01 जे.सी.बी., 01 गॅसकटर, 01 इलेक्ट्रीक हॅमर यांचा वापर करण्यात आलेला आहे.
यापुढे देखील अशा प्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई तीव्र करण्यात येईल.