जेएनपीटी बंदराकडे जाणाऱ्या गव्हाणफाटा येथील रेल्वे रुळावर कंटेनर ट्रेलरला अपघात; चालक जागीच ठार तर जेएनपीटी रेल्वे मार्गावरील वाहतुक सेवा 9 तास ठप्प
संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)
उरण (दिनेश पवार) : जेएनपीटी – गव्हाण फाटा उड्डाण पूलावरुन मार्गक्रमण करणारा कंटेनर टेलर रेल्वे रुळावर पडला. या दुदैवी अपघातात टेलर चालक जागीच मृत्यू पावला आहे. सदर अपघात हा शनिवारी रात्री ९-३० च्या सुमारास घडला असून या अपघातामुळे जेएनपीटी बंदराकडे जाणारी मालवाहू रेल्वेसेवा 9 तास ठप्प झाली होती.
जेएनपीटी बंदर व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी जेएनपीटी, सिडको आणि राज्य, केंद्र शासन यांनी उरण, नवी मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणात उड्डाण पूलाची उभारणी करण्यास सुरुवात केली आहे. परंतु या तीन ही व्यवस्थापनाच्या डोळे झाक कारभारामुळे उड्डाण पूलावर अपघाताची संख्या बळावली आहे. त्यात नव्याने वाहतूकीसाठी सुरु करण्यात आलेल्या उड्डाण पूलावरुन शनिवारी रात्री 9:30 च्या सुमारास मालाची वाहतूक करणारा कंटेनर टेलर पलटी होण्याची दुदैवी घटना घडली.
सदर मालानी भरलेला कंटेनर टेलर पुलावरुन 40 फुटांवरून जेएनपीटी बंदराच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे रुळावर पडला. या झालेल्या अपघातात कंटेनर टेलर चालकांचा जागीच मुत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. सदर अपघातामुळे जेएनपीटी बंदराकडे जाणारी मालवाहू रेल्वेसेवा 9 तास ठप्प झाली होती. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस, वाहतूक पोलीस यंत्रणा घटना स्थळी तात्काळ दाखल झाली. परंतु या परिसरातील अंधारामुळे रेल्वे रुळ मोकळा करण्यासाठी तसेच तपास कार्यात अडथळा निर्माण झाला होता.