महाराष्ट्र

आता एनएमएमटीची प्रवासी सेवा कर्जतपर्यंत

संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC) संपाच्या अनुषंगाने नवी मुंबई व कर्जत विभागातील नोकरी, धंदा, विविध व्यवसाय करणारे प्रवाशी तसेच लोकप्रतिनिधी यांचेकडून मोठ्या प्रमाणात वारंवार केल्या जात असलेल्या मागणीनुसार तसेच या कार्यक्षेत्रात असलेल्या शाळा / कॉलेजेस सुरू होत असल्याने प्रवाशी जनतेच्या हितार्थ बुधवार दि.17/11/2021 पासून एमएमएमटी बसचा नवीन बस मार्ग क्र.49 – नवी मुंबई ते कर्जत असा सुरू करण्यात येत आहे.  

नवी मुंबई ते कर्जत बस मार्गाची संक्षिप्त माहिती –

1.प्रवास मार्गबेलापूर रेल्वे स्थानक, बेलपाडा गाव / खारघर रेल्वे स्थानक, स्पॅगेटी /घरकुल, कामोठे गाव / के.एल.ई.कॉलेज, आसुडगाव आगार, ठाणा नाका, पनवेल रेल्वे स्थानक (सर्कल), भिंगारी, हॉटेल राहुल पार्क, कोन गाव, शेंडुग, ठोंबरेवाडी / गोदरेज सिटी, बारवईगाव -1, महाराष्ट्र जिवन प्राधिकरण कार्यालय, लोधिवली, चौक नाका, एन.डी.स्टुडीओ / आदिवासी पाडा, इंद्रप्रस्थ / ठाकूर इस्टेट, वावर्ले, हालफाटा, कर्जत बस स्थानक,
2.बस संख्या08
3.प्रस्थानांनतर30 ते 35 मिनिटे
4.पहिली बसबेलापूर रेल्वे स्थानक       :  6.45कर्जत बस स्थानक   :  6.50
 शेवटची बसबेलापूर रेल्वे स्थानक    : 20.45कर्जत बस स्थानक   : 21.15 

तरी सदर बस सेवेचा लाभ सर्व प्रवाशांनी घ्यावा असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमामार्फत करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button