महाराष्ट्र

उरणला जाण्यासाठी फुंडे हायस्कूल, बोकडवीरा मार्गे रस्ता बंद

संपादक : सुनील तावडे (९००४२४९२६२)

उरणला जाण्यासाठी फुंडे हायस्कूल, बोकडवीरा मार्गे रस्ता बंद, भेंडखळ वरून द्रोणागिरी मार्गे हेलपाटा, प्रवाशांचे हाल, सिडको ऑफिस समोरील ब्रिज लवकरात लवकर बनवण्याची व रेग्युलर रूट सुरू करण्याची मागणी

उरण (दिनेश पवार) : पनवेल, नवी मुंबईतुन उरण मध्ये जाण्यासाठी असलेला रेग्युलर रस्ता बसेस व अवजड वाहनांसाठी रस्ता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. सिडको ऑफिस समोरील छोटा ब्रिज अतिधोकादायक झाल्याने हा मार्ग वळविण्यात आला आहे. या आधी पनवेल, नवी मुंबईतुन येणाऱ्या बसेस उरण बस स्टॉप कडे जाण्यासाठी फुंडे हायस्कूल, बोकडविरा या मार्गे जायच्या. मात्र हा रूट रस्ता बंद करण्यात आला असून फुंडे हायस्कूलच्या अलीकडे असलेल्या ब्रिज पासून भेंडखल वरून वाहतूक वळवून द्रोणागिरी नोड असा पूर्ण रस्ता फिरून मग बसेस नवीन शेवाला बाहेर पडल्या जातात. त्यामुळे रेग्युलर रूट मध्ये असलेल्या गावातील नागरिकांचे व उरण मधील प्रवाशांना हेलपाटे घालून जावे लागते तर रिक्षाचा आधार घ्यावा लागत असल्याने प्रवाशांना व चाकरमान्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय.

लवकरात लवकर ब्रिज बनवा व बसेसचा रेग्युलर रूट सुरू करा – चाकरमान्यांची मागणी:

उरण मध्ये जाण्यासाठी फुंडे हायस्कूल, बोकडवीरा या मार्गे या आधी बसेस जायच्या त्यामुळे शहरात जाण्यासाठी लागणारी गावे व ऑफिसेस मधील कर्मचाऱ्यांना हा रस्ता अतिशय सोयीस्कर होता. मात्र सिडको ऑफिस जवळील छोटा पूल अतिधोकादायक घोषित करण्यात आल्याने येथील वाहतूक पूर्णपणे वळविण्यात आली आहे. त्यामुळे सर्व बसेस फुंडे हायस्कूलच्या अलीकडे असलेल्या ब्रिज पासून भेंडखल वरून वाहतूक वळवून द्रोणागिरी नोड असा पूर्ण रस्ता फिरून मग बसेस नवीन शेवाला बाहेर पडल्या जात आहेत. त्यामुळे पूर्ण हेलपाटे घालून उरणला जावं लागत असल्याने प्रवाशांचे हाल होतच आहेत. शिवाय वेळही वाया जात आहे. त्यामुळे नागरीकांना रिक्षाचा आधार घ्यावा लागतोय व ज्यादा पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर ब्रिज बनवा व बसेसचा रेग्युलर रूट सुरू करा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ व चाकरमान्यांची केली आहे.

हेलपाट्यामुळे वेळ वाया, ग्रामस्थ, प्रवासी व चाकरमान्यांना रिक्षाचा आधार:

मार्ग वळविण्यात आल्याने फुंडे, बोकडवीरा व या मार्गातील प्रवाशांना तसेच उरण मध्ये येणाऱ्या चाकरमान्यांना टावूनशिप ला उतरून मग त्यांना ऑटो ने जावं लागत आहे.. त्यामुळे रिक्षा शिवाय पर्याय प्रवाशांना उरला नाही. हा हेलपाटा घेताना भेंडखल वरून बाहेर पडताना बरेच स्टॉप असल्याने 20 मिनिटांपेक्षा जास्त वेळ जात असल्याने नागरिकांना रिक्षाचा आधार घ्यावा लागतोय.

चौकट:
शासनाकडून रस्ता मंजूर झाल्यावर पूल झाल्यावर रेग्युलर रस्त्याने वाहतूक सोडणार – सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी

एकूण साडेसहा किलोमीटरचा हा रस्ता आहे. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असून या रस्त्याच्या कामाबाबत शासनाकडे व सिडकोकडे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविले आहे. तसेच शासनाकडे व सिडकोकडे या रस्त्यासाठी निधीची मागणी करण्यात आली आहे. सिडको या रस्त्यासाठी निधी देण्यासाठी तयार आहे. तसेच या रस्त्याच्या हस्तांतरणा संदर्भात सिडको सोबत पत्रव्यवहार सुरू लवकरच हा रस्ता सिडको कडे हस्तांतरित होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. हा रस्ता उरण शहरापासून सुरू होतो ते बोकडवीरा पर्यँत साडेसहा किलोमीटर पर्यंत संपतो.

कोट:
बसेसचा रूट बदलल्यामुळे टाऊनशिप पर्यँत ठीक आहे परंतु तिथून पुढच्या लोकांना म्हणजेच फुंडे हायस्कूल आणि त्या पुढच्या गावातील लोकांना टाऊनशिप पासून रिक्षा करून जावे लागत असल्याने ऑटो शिवाय पर्याय राहिला नाही. आणि रिक्षा वाले वाटेल तसे पैसे मागतात. त्यामुळे लवकरात लवकर रेग्युलर रस्ता सुरू करावा हीच आमची मागणी आहे – वसुंधरा पाटील (चाकरमानी)

कोट:
आम्हाला ऑफिसला जाताना बसचा रूट बदलल्याने पूर्ण हेलपाटा घालून जावं लागतं. त्यामुळे वेळ जातोच आणि रिक्षाने जायचं असेल तर रिक्षा वाले पैसे पण जास्त सांगतात. त्यामुळे लवकरात लवकर आमचा नेहमीचा रस्ता सुरू झाला पाहिजे. – मनोज शेळके (प्रवासी)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button