महाराष्ट्र

चाइल्ड डेव्हलपमेंट फाऊंडेशनचा बालदिन व दिवाळी निराधार व बेघर मुलांसमवेत साजरी

(नवी मुंबई) बालदिन व दिवाळीचे औचित्य साधत चाईल्ड डेव्हलपमेंट फाऊंडेशनच्या वतीने निराधार व बेघर गरजवंत मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

गेली सहा वर्ष हा उपक्रम संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येतो. निराधार मुलांचे संगोपन करण्यासाठी ही संस्था नेहमीच अग्रेसर राहिली आहे. जी मुले खरोखरच निराधार आहेत अशा गरजवंत मुलांना शिक्षणाकरिता मदत केली जाते. या वर्षी याच अनुषंगाने नुकत्याच झालेल्या दिवाळीचे व बालदिनाचे औचित्य साधत नेरूळ येथे केक कापून व शैक्षणिक साहित्याचे चे वाटप करण्यात आले. यावेळी मुलांना दप्तर, पुस्तके, कंपास पेटी, नोटबुक्स, साबण, टूथपेस्ट, मिठाई चॉकलेट्स व इतर शैक्षणिक साहित्य संस्थेचे अध्यक्ष विशाल गारगोटे, समाजसेविका रजनी कलोसे, अनघा लाड, मुकेश पाटील, समाजसेविका उषा रेणके व इतर मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले

हा कार्यक्रम संस्थेचे संस्थापक विशाल गारगोटे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येतो. ते याविषयी अधिक माहिती देताना सांगतात की “समाजात कित्येक निराधार, बेघर व अनाथ मुलांना मदतीची गरज असते. बालपण हे प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचं वय असतं यावेळी शिक्षण व आधार मिळाला तर त्यांचे पुढील आयुष्य हे प्रकाशमय होऊ शकतं. योग्य वेळी योग्य मदत व दिशा मिळाली तर बालपणाला एक चांगले वळण लागू शकते. कित्येक मुलांना ते निराधार असल्याने योग्य मदत मिळत नाही व ते गुन्हेगारीकडे वळतात. आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे की त्यांना सुद्धा समाजाचा एक घटक मानून त्यांना शिक्षण दिले पाहिजे तर त्यांचे आयुष्य सुखकर होईल. असे कार्य करताना समाज हीत साधले जाते व देशाच्या उन्नतीला मदत होते.”

यावर्षीचा बालदिन त्यांच्यासाठी आगळावेगळा ठरला. ही संकल्पना ज्यांनी सत्यात उतरवली ते विशाल गारगोटे गेली अकरा वर्ष सामाजिक क्षेत्रात आरोग्य, शिक्षण तसेच कौशल्य प्रशिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी मोरया इंटरटेनमेंट ही संस्था स्थापन करून शास्त्रीय संगीताचा पाया भक्कम करण्यासाठी विविध सांगीतिक कार्यक्रम राबविले आहेत. यामध्ये पद्मश्री अनुप जलोटा, पद्मभूषण जाकीर हुसेन, पद्मभूषण अमजद अली, पद्मश्री शुभा मुग्दूल, शास्त्रीय गायक राहुल देशपांडे व महेश काळे यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करून सहायता निधी उपलब्ध केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button