शिवसेनेचा युवासेना पदाधिकारी संवाद मेळावा संपन्न
दिनांक ३० ऑक्टोबर रोजी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विष्णूदास भावे नाट्यगृहामध्ये युवासेनेचे सचिव मा. श्री. वरुण सरदेसाई ह्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली युवासेना पदाधिकारी संवाद मेळावा पार पडला. यावेळी खासदार राजन विचारे, शिवसेना उपनेते विजय नाहाटा, मा. विरोधीपक्षनेते विजय चौगुले, मा. सर्व शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
युवासेनेचे सचिव मा. श्री. वरुण सरदेसाई ह्यांनी यावेळी बोलताना सांगितले कि “माझी स्वतःची राजकीय कारकीर्द नवी मुंबईतून सुरु झाली. नवी मुंबईच्या प्रत्येक कॉलेजवर युवासेनेचे एक युनिट आहे. वाढत्या महागाई विरोधात पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यात व शहरात सायकल रॅली काढली जाईल. शिवसेनेचाच महापौर झाला पाहिजेल हि शिवसैनिकांची भूमिका आहे. युवासेनेची व युवतीसेनेची नवीन एक टीम लवकरच नवी मुंबई मध्ये दिसेल व ती टीम येत्या आगामी निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारे काम करेल. युवासेनेने कोव्हीड काळात खूप चांगले काम केले आहे.”