नवी मुंबई करांनी अनुभवला शादी बाय मॅरियट चा आगळावेगळा अनुभव
नवीमुंबई प्रतिनिधी : प्रत्येकाच्या जीवनातील अमूल्य क्षण म्हणजे त्या व्यक्तीचा विवाह असतो. प्रत्येक लग्नाला अविस्मरणीय कसे बनवायचे याची एक झलक वाशीच्या फोर पॉइंट्स शेरेटन आणि त्यांच्या विवाह नियोजक यू अँड आय एंटरटेनमेंट, इ एम सी वेडिंग्ज, मॅरीगोल्ड, जैन डेकोरेटर आणि अष्टविनायक डेकोरेटर यांनी एक सुंदर विवाह मेळावा आयोजित करून दाखविला.
या शादी बाय मॅरियट लग्न सोहळ्यात फक्त नवरा-नवरी नव्हे तर लग्नामध्ये असणारे प्रत्येक घटक सामील होते. ज्याचा उद्देश दर्शकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव देण्याचा होता. विवाह हा जोडप्यासाठी आणि त्यांच्या प्रियजनांसाठी सर्वात अविस्मरणीय काळ असतो आणि हा एक्स्पो हा त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस बनवण्यासाठी सर्वात सुंदर डिझायनर पोशाखांसाठी यावेळी मॉडेल्स नि केलेला फॅशन वॉल्क हा डोळे दिपवणारा ठरला.
रिचा हावरे, बावरी, मारिया ब्राउन कौचर, फॉरएव्हर प्रीटी, भानू देसिगर यांच्या फॅशनबेल कपड्यांमध्ये मॉडेल्स रॅम्पवर आपल्या सौन्दर्याची भुरळ पाडत वॉक केले. यावेळी सर्वात आकर्षक ठरला तो सन्यास द बँडचा धमाकेदार परफॉर्मन्स यामध्ये गायक मनमित सिंग, सोहम दोशी, रोहन जाधव ह्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. चिन्मय पादी यांच्या सोल टू सोल अकादमीच्या दमदार नृत्यांनी कार्यक्रमात अधिकच रंगात आणली. अभिनेत्री अक्षता सोनवणे, अभिनेत्री जुई बेंडखळे यांच्यासह इतर कलाकार यावेळी उपस्थित होते.
फोर पॉइंट्स शेरेटनचे वाशीचे मुख्य व्यवस्थापक स्टीफन डिसुझा यांनी सांगितले कि “आमच्या ग्राहकांना आम्ही नेहमीच उत्तम सेवा देत असतो. आपल्या आयुष्यातील लग्नासारख्या महत्वपूर्ण क्षणाला आम्ही अधिक उत्तम बनवू कारण आम्ही सर्व मिळून तुम्हाला सर्वोत्तम सेवा उपलब्ध करू, ती मग डेकोरेशन असो, व्यवस्थापन असो किंवा जेवण असो.”