देश

आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड “आयुष्मान आधार” सामाजिक बांधिलकी प्रकल्पांतर्गत देणार १२ राज्यांत १२ रुग्णवाहिका

प्रतिनिधी : आधार हाउसिंग फायनान्स लिमिटेड (आधार) ही भारतातील सर्वात मोठी माफक दारात गृह कर्ज देणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. जी समाजातील अल्पउत्पन्न वर्गातील कुटुंबांना गृह कर्ज पुरवठा करते. आधार लाखो लोकांना त्यांच्या पहिल्या घरांचा मालक बनविण्यास सक्षम बनविते. २०१० मध्ये स्थापित, आधारने देशभरातील २९२ शाखांमधून यशस्वीरित्या १,६६,७५८ ग्राहकांची सेवा केली आहे.

आधार सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून संपूर्ण भारतामध्ये विविध सामाजिक उपक्रमात सक्रियपणे सहभाग नोंदवत आहे. आधार सामाजिक भावनेने समाजाला परतफेड करण्यामध्ये विश्वास ठेवते. संस्थेच्या विविध सीएसआर कार्यक्रमांद्वारे आणि प्रकल्पांद्वारे संस्थात्मक बांधणीतून समुदाय विकासाकडे जाण्याचा त्यांचा हेतू आहे.

सामाजिक बांधिलकी प्रकल्प ‘आयुष्मान आधार’ अंतर्गत कंपनीने फेज १ मध्ये कोविड – १९ च्या संकटकाळात देशातील ०७ राज्यांमध्ये यशस्वीरित्या १०० मोफत वैद्यकीय आरोग्य शिबिरे आयोजित केली आहेत आणि आता कंपनी त्याच्या अंमलबजावणी भागीदार वाई फोर डी फाउंडेशन जी समाजातील वंचितांच्या सशक्तीकरणासाठी कार्यरत असणारी संस्था आहे यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या महत्त्वपूर्ण ठिकाणी ०८ रुग्णवाहिका विविध ८ राज्यांमध्ये प्रदान करीत आहे. ज्या आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी खास वाहन म्हणून वापरली जाईल. खास करुन समाजातील वंचितांसाठी हि सेवा त्यांच्या आपत्कालीन काळात रुग्णांसाठी वरदान समजले जाते.

दिनांक ३० ऑक्टोबर रोजी आधार आपल्या “आयुष्मान आधार रुग्णवाहिका” फेज २ कार्यक्रमाचे उद्घाटन करून ०८ रुग्णवाहिकांना मुंबई येथून मुख्य अतिथी श्री. युवराज वाल्मीकि (भारतीय हॉकी खेळाडू), श्री. देव शंकर त्रिपाठी (एम् डी-सीईओ-आधार हाउसिंग फायनान्स लिमिटेड), श्री ऋषि आनंद (मुख्य व्यवसाय अधिकारी) श्री. ऋषिकेश झा (पीपल चीफ ऑफिसर), श्रीमती अर्चना अक्षय कोळी (सीनियर पीपल रिलेशन मैनेजर), श्रीमती रुत्वी मेहता (Assistant Manager-HR&CSR) आणि श्री. प्रफुल्ल निकम (प्रतिनिधि – वाई 4 डी फाउंडेशन) यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवला.

प्रसंगी श्री. युवराज वाल्मीकि म्हणाले “आधारच्या या पुढाकाराने असंख्य लोकांचे प्राण वाचविण्यास मदत होऊ शकेल कारण रुग्णवाहिकांच्या मदतीने रुग्णांना आपत्कालीन वैद्यकीय सहाय्य मिळू शकेल आणि वेळेवर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करता येऊ शकेल, मी आधार सामाजिक लाभासाठी घेत असलेल्या पुढाकारासाठी त्यांचे खरोखर कौतुक करतो”.

श्री. देव शंकर त्रिपाठी म्हणाले, “आधार हाउसिंग फायनान्स ही समाजातील अल्प उत्पन्न वर्गातील लोकांच्या घराचे स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कंपनी म्हणून ओळखली जाते. कंपनीचा आयुष्मान आधार हा पुढाकार हा आपल्या देशातील आरोग्य सुविधा सुधारण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल आहे.”

वाय 4 डी फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. प्रफुल निकम म्हणाले “आधार द्वारे दान केलेली रुग्णवाहिका तातडीने वैद्यकीय सेवेची गरज असलेल्यांना घटनास्थळावर उपचार देण्यासाठी आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुरविते आणि यामुळे रूग्ण विशेषत: वंचितांना त्या ठिकाणच्या आसपासच्या व्यक्तींकडे पुढील काळजी घेण्यास मदत होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button