एफ जी नाईक महाविद्यालयात राष्ट्रीयएकात्मता दिन व लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी
एफ जी नाईक महाविद्यालय आणि राष्ट्रीय सेवा योजना युनिटच्या संयुक्त विद्यमानाने आज सकाळी १० वा. ऑनलाईन व्यासपीठाच्या माध्यमातून राष्ट्रीय नेते लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती तसेच स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव म्हणून राष्ट्रीय एकात्मता दिन साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे विद्यार्थी कु. यश दळवी व कु. योगिता देशभ्रतार ह्यांनी राष्ट्रीय एकता दिवसा निमित्ताने आपले विचार मांडले व सर्व विद्यार्थ्यांना भेदभाव त्यागून एकीने राष्ट्राचे हित जोपासण्यासाठी व भारत देशाचे नाव उज्वल करण्यासाठी आव्हान केले.
सदर कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. प्रताप महाडिक यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकपर भाषणात सरदार वल्लभभाई पटेल यांचे भारतीय स्वातंत्र्यातील योगदान आणि आधुनिक भारत निर्माण याबाबतीतील अतुलनीय कार्याचे मत प्रदर्शित केले. राष्ट्रीय एकात्मतेचा पाया खऱ्या अर्थाने वल्लभभाई यांनी निर्माण केला. स्वातंत्र्यउत्तर भारतातील विविध संस्थानांना एकत्रित करून आजचा आधुनिक भारत निर्माण करण्याचा पाया रचून दिला.
याशिवाय महाविद्यालय विद्यार्थी आणि राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक म्हणून आपण सर्वांनी राष्ट्रीय एकात्मतेवर कायम दक्ष राहून कार्य करण्याचे आवाहन केले तसेच राष्ट्रीय एकात्मतेची शपथ एकात्मतेची शपथ सर्व उपस्थितांनी घेतली याशिवाय राष्ट्रीय एकात्मतेवर एनएसएस स्वयंसेवकांनी तयार केलेले चित्र प्रदर्शित करण्यात आली.
सदर कार्यक्रमाचे आयोजन कार्यक्रम अधिकारी प्राध्यापिका जयश्री दहाट व प्राध्यापक संदेश सूर्यवंशी यांनी केले व सूत्रसंचालन प्राध्यापिका स्वाती हैलकर ह्यांनी केले.