वाशी मधील समस्यांबाबत वाशी ब्लॉक अध्यक्ष सचिन नाईक ह्यांचे आयुक्त अभिजित बांगर ह्यांना निवेदन
दिनांक २२ रोजी वाशी मधील समस्यांबाबत वाशी ब्लॉक अध्यक्ष सचिन नाईक ह्यांनी आयुक्त अभिजित बांगर ह्यांना निवेदन दिले.
वाशी मध्ये अनेक प्रश्न रेंगाळलेले आहेत जसे वाशी प्लाझा ते ब्लू डायमंड पर्यंत होणारी वाहतूक कोंडी; यासाठी उड्डाणपूल बांधण्यात यावा. वाशी सेक्टर १५ मधील सिडकोकालीन असलेला जलकुंभ; मागे असाच सिडकोकालीन जलकुंभ अचानक पडल्याने नशिबाने कोणतीही मनुष्यहानी झाली नव्हती परंतु सेक्टर १५ येथील सिडकोकालीन असलेला जलकुंभ भर वस्तीमध्ये असल्याने मनुष्यहानी तसेच वित्तहानी होऊ शकते. त्यामुळे सिडकोकालीन असलेला जलकुंभ निष्कासित करून त्याजागी नवीन जलकुंभ बांधण्यात यावा.
काही महिन्यांपासून वाशी परिसरात डेंग्यूची साथ वाढल्याने धुरीकरण व निर्जंतुकीकरण सातत्याने करण्यात यावे. जेणे करून साथीचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.
यावेळी नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अनिल कौशिक व नेरुळ ब्लॉक अध्यक्ष रवींद्र सावंत उपस्थित होते.