नवी मुंबई
ऐरोली विभागामार्फत अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील जी विभाग ऐरोली अंतर्गत यादवनगर ऐरोली येथे अनधिकृतपणे रस्ते व फुटपाथवर फेरीवाला व्यवसाय सुरु होते
सदर अनधिकृत फेरीवाल्यांवर विभागामार्फत फेरीवाला हटाव मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले असून एकूण 05 हातगाडी, स्टील काऊंटर, नाशीवंत भाजापाला इतर सामान जप्त करण्यात आले असून क्षेपणभूमी येथे जमा करण्यात आले. या धडक मोहिमेसाठी 08 मजूर, 2 पिकअप व्हॅन कारवाई करीता वापरण्यात आले. सदरची कारवाई सहाय्यक आयुक्त, जी विभाग ऐरोली यांचे मार्गदर्शनाखाली कनिष्ठ अभियंता (अतिक्रमण) व अतिक्रमण विभागातील पोलिस पथक व अधिकारी/कर्मचारी आणि सुरक्षारक्षक यांचेमार्फत करण्यात आली.
यापुढे देखील अशा प्रकारे कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.