क्राइम

ग्रँड सेंट्रल मॉल समोर खुनी हल्ला करणा-या आरोपी इसमांना एनआरआय सागरी पोलिसांकडून अटक

जुन्या भांडणाचा राग मनात धरून भर रस्त्यात ग्रँड सेंट्रल मॉल हया गर्दीच्या ठिकाणी शहराबाहेरील आरोपीकरवी खुनी हल्ला करणा-या आरोपी इसमांना एनआरआय सागरी पोलीस ठाणेकडुन अटक करून गंभीर स्वरूपाचा गुन्हा उघडकीस आणला गेला.

दि. ०९/१०/२०२१ रोजी सीवुड ग्रँड सेंट्रल मॉल समोरील गजबजलेल्या परिसरात गर्दीच्या वेळी फिर्यादी यांना भर रस्त्यात अडवुन अनोळखी इसमांनी जीवघेणा हल्ला केलेला होता. व गुन्हयातील अनोळखी आरोपी इसम हे गुन्हा केल्यानंतर तात्काळ घटनास्थळावरून पळुन गेलेले होते. सदर बाबत एनआरआय सागरी पोलीस ठाणे येथे गु.र.क. २४१/२०२१ कलम ३०७, १४३, १४४, १४६, १४८, ३२३, ५०६, १२० (ब) भादवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

सदर गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने तसेच सदरचा गुन्हा ज्या ठिकाणी घडला त्या ठिकाणाच्या व्यतिरिक्त इतर कोठेही सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध नव्हते असा क्लिष्ट गुन्हा तातडीने उघडकीस आणणेबाबत मा. पोलीस आयुक्त, बिपीनकुमार सिंह सो, मा. सह पोलीस आयुक्त जय जाधव सो, यांनी आदेशित केलेले होते.

त्याअन्वये सदर गुन्हयाचा तपास मा. पोलीस उप आयुक्त परि ०१, वाशी, सहा. पोलीस आयुक्त तुर्भे विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक एनआरआय पो ठाणे व पोलीस निरीक्षक गुन्हे एनआरआय सागरी पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली एनआरआय सागरी पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी अनोळखी आरोपी इसमाचा शोध सुरू केला.

गुन्हे प्रकटीकरण पथकाने गुन्हयाचे घटनास्थळावरील प्राप्त सीसीटीव्ही फुटेज मधील अनोळखी आरोपी इसमाचे शोध कामी अविरत ०७ दिवस केलेला तांत्रिक तपास सीसीटीव्ही फुटेजमधील अनोळखी पाहिजे आरोपी इसम यांचे वर्णन वाशी, कोपरखैरणे, नेरूळ, मानखुर्द, गोवंडी, भायखळा, सातरस्ता, चेंम्बुर, नागपाडा या परिसरातील गुप्त बातमीदार यांना दिलेले होते. सदर गुन्हयातील पाहिजे आरोपी इसमांचा शोध चालु असताना केलेला तांत्रिक तपास व गुप्त बातमीदार यांचे खबरी नुसार नमुद गुन्हा हा आरोपी नामे जस्मिन तांडेल व निलेश तांडेल राह करावेगाव हयाचे सांगणेवरून रेकॉर्ड वरील आरोपी नामे अमित भट हयाने ०३ विधीसंघर्षग्रस्त बालक व पाहिजे आरोपी आकाश साखरे, सन्नी व गांधी यांचे करवी केलेला असल्याचे उघडकीस आले असुन अटक आरोपी व ताब्यात घेण्यात आलेल्या विधीसंघर्षग्रस्त बालकाकडुन गुन्हयात वापरलेली दोन वाहने तसेच कोयता व सुरा अशी शस्त्रे हस्तगत करण्यात आलेले आहे.

गुन्हयाचा उद्देश : अटक आरोपी क्र. ०१ व नमुद गुन्हयातील फिर्यादी यांचेमध्ये सन २०१७ ग्रँड सेंट्रल मॉल येथे मॉलच्या ठेक्यावरून भांडण झालेले होते. त्यामध्ये आरोपी क्र. ०१ हयाचा कोणताही ठेका नसताना फिर्यादीने आरोपीचा मित्र मन्नु नाईक हयास मारहाण केलेली होती. त्यावेळी मन्नु नाईक हयास आरोपी क्र. ०१ हा हॉस्पीटलला घेवुन जात होता. म्हणुन फिर्यादी यांनी त्यास मारहाण केलेली होती. त्यामुळे आरोपी क्र. ०१ हयाचे उजव्या हातास दुखापत झालेली होती. सदर हाथ आरोपी क्र. ०१ हयाचा अदयाप पर्यंत निट काम करत नाही याचा राग आरोपीस होता. सदरचे भांडण झाल्यानंतर ही फिर्यादी हा बलवान असल्याने अटक आरोपीस वारंवार त्रास देत होता. तसेच आरोपी क्र. ०१ हा त्याचे मैत्रिणीसोबत असताना देखील फिर्यादी हा त्याचा अपमान करत होता. या गोष्टीचा राग मनात धरून आरोपी क्र. ०२ हयाचे सोबत कट रचुन पाहिजे आरोपी व विधीसंघर्ष ग्रस्त बालक हयांनी दोन दिवस फिर्यादी यांचे वर पाळत ठेवुन तिस- दिवशी जिवघेणा हल्ला केला आहे.

अटक आरोपी इसमांचे नाव व पत्ता :
१)जस्मीन ज्ञानेश्वर तांडेल वय ३७ वर्षे, धंदा – रिअल इस्टेट, रा. ठि घर नं. २०४, गावदेवी मंदिराचे बाजुस, सेक्टर ३६ करावेगाव, नवी मुंबई
२)अमित वर्धराजन भट वय ३६ वर्षे, धंदा साईट सुपर वायझर रा. ठि. बंगलो नं. बी / ०६, छगन विटा पेट्रोल पंपाचे पुढे, वामनवाडी, चेंबुर मुंबई
३) ०३ विधीसंघर्षग्रस्त बालक

गुन्हयात वापरलेली मो / सायकलचे वर्णन :
१) किं रू. ५०,०००/- होन्डा कंपनीची सी.बी. ट्रिगर मोटारसायकल क्र. एमएच ०३ बीक्यु ५३१५
२) किं रू. ४०,००० / – सुझुकी कंपनीची ACCESS 125 स्कुटी क्र. एमएच ०१ बीक्यु ९५७०

गुन्हयात वापरलेली हत्यार :
१) कि रू. ००:०० स्टीलचा चाकु त्याला लाकडी चौकोणी मुठ
२) किं रू. ००:०० लोखंडी कोयता त्याला गोल लाकडी मुठ

अटक आरोपी हयाचा गुन्हे अभिलेख :
आरोपी जस्मीन तांडेल अभिलेख:
१) एनआरआय सागरी पोलीस ठाणे गु.र.क. २७० / २०१७ कलम ३२४,५०४,५०६,३४ भादवि
आरोपी अमित भट अभिलेख :
१) एनएमजोशी पोलीस ठाणे मुंबई गु.र.क १७५/२०१७ कलम ३२६,३२४,३६५,३८४,५०६,१४३,१४७,१४९ भादवि
२)आग्रीपाडा पोलीस ठाणे मुंबई गु.र.क २०७/२०१७ कलम ३०७,५०४,१४३,१४४,१४८,१४९ भादवि
३) गोवंडी पोलीस ठाणे मुंबई गु.र.क २०/२०२१ कलम ३०७,१४३,१४७,५०६(२),३२३ भादवि

सदरची उत्तम कामगिरी मा. पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग सो, सह पोलीस आयुक्त जय जाधव सो यांचे आदेशान्वये मा. पोलीस उप आयुक्त परि ०१ विवेक पानसरे सो, सहा. पोलीस आयुक्त गजानन राठोड सो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे पृथ्वीराज घोरपडे यांचे मार्गदर्शनाखाली एनआरआय पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि चासकर, निगळ, पोह पाटील, वाघ, पो ना देवरे, फंड, तांडेल, चव्हाण, पो शि वाघ सीबीडी पोलीस ठाणे, पो शि बुधनवार, बरखडे नेरूळ पो. ठाणे यांनी केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button