न.मुं.म. परिवहन उपक्रमाच्या वातानुकुलीत बससेवेचे आजपासून तिकीट दर कमी
मा. प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, मुंबई महानगर क्षेत्र यांच्या बैठकीतील निर्णयानुसार नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या वातानुकूलित बसेसचे तिकीट दर कमी करण्यास मान्यता देण्यात आल्याने आज दिनांक २३/१०/२०२१ पासुन नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या वातानुकुलीत बस सेवेकरीता सोबत जोडण्यात आलेल्या नवीन भाडेटप्पा दरपत्रकानुसार कमी करण्यात आलेले सुधारीत तिकीट दराची अंमलबजावणी करण्यात येईल.
नव्याने देण्यात येत असलेल्या सवलती
१) १२ वर्षे वयापर्यंतच्या मुलांना बसेसमध्ये प्रौढ बसभाडे तिकीट रकमेवर 50% सवलत.
२) नमुंमपा क्षेत्रात रहिवाशी असलेल्या व उपक्रमाचे ओळखपत्र धारक 65 वर्षे वयावरील जेष्ठ नागरीकांना बसेसमध्ये प्रवास भाडयात 50% सवलत.
३) नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विदयार्थ्यासाठी 50% सवलतीची मासिक बस पास योजना.
प्रवाशी बस पास योजना
परिवहन उपक्रमाच्या वातानुकूलीत, व सर्वसाधारण बसगाडयांच्या प्रवाशांसाठी साप्ताहीक, मासिक, त्रैमासिक, सहामाही, वार्षिक तसेच मॅजिक पास अशा निरनिराळया प्रकारच्या बस पास योजनांचा तपशिल खालील प्रमाणे आहे.