घणसोली विभागातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई
नवी मुंबई महानगरपालिका विभाग कार्यालय घणसोली कार्यक्षेत्रातील नमुंमपा सार्वजनिक शौचालयाजवळ, कौलआळी, घणसोली या ठिकाणी अनधिकृतपणे आरसीसी जोत्याचे काम तसेच सार्वजनिक शौचालय कौलआळीच्या मागे, मलनिस्सारण केंद्रा समोर, कौलआळी, घणसोली याठिकाणी आरसीसी फुटींगचे काम प्रगती पथावर होते.
या दोन्ही बांधकामधारकांनी नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही पुर्व परवानगी न घेता अनधिकृत पणे बांधकाम सुरू केले होते. सदरील अनधिकृत बांधकामांस घणसोली विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजाविण्यात आलेली होती. संबंधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविणे आवश्यक होते. परंतू त्यांनी सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरू ठेवले होते.
या अनधिकृत बांधकामावर घणसोली विभागामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले होते. त्यानुसार दोनही अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आलेली आहेत. या धडक मोहिमेसाठी घणसोली विभागातील अधिकारी / कर्मचारी, मजूर-10, ब्रेकर-3, जेसीबी-1, गॅसकटर-1 तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलीस पथक तैनात होते.
यापूढे देखील अशाप्रकारे कारवाई तिव्र करण्यात येणार आहे.