बेलापूर विभागातील अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई
नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील बेलापूर विभागांतर्गत दिवाळे गांव, सेक्टर-१४ येथील 2 बांधकामधारकांनी नवी मुंबई महानगपालिकेची कोणतेही पुर्वपरवानगी न घेता अनधिकृतपणे बांधकाम सुरु केले होते. या अनधिकृत बांधकामांस बेलापूर विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ मधील कलम ५४ अन्वये नोटीस बजावण्यात आलेली होती. संबंधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविणे आवश्यक होते. परंतु त्यांनी सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरु ठेवले होते.
या अनधिकृत बांधकामांवर बेलापूर विभागामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करुन करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. या धडक मोहिमेसाठी बेलापूर विभागाकडील अधिकारी/कर्मचारी, १० मजुर, १ गॅसकटर, १ इलेक्ट्रीकल हॅमर तसेच स्थानिक एन.आर.आय. पोलीस व नमुंमपा अतिक्रमण विभागाकडील पोलीस तैनात होते.
यापुढे देखील अशाप्रकारे कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.