शिवसह्याद्री ऐक्यवर्धक सामाजिक सेवा संस्था आयोजित नवदुर्गांचा सन्मान आणि विवाहित एकल महिलांचे माहेर
शिवसह्याद्री ऐक्यवर्धक सामाजिक सेवा संस्था आयोजित ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ आणि ‘विवाहित एकल महिलांचे माहेर’ हा कार्यक्रम काल बुधवार दि. १३ ऑक्टोबर २०२१ रोजी आर्य समाज, सिवुड्स येथे दुपारी ३.०० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी कोरोना काळात ज्या महिलांनी घरचा कुटुंब प्रमुख गमावला आहे अशा माता, भगीणींना शिवसह्याद्री ऐक्यवर्धक सामाजिक सेवा संस्था ही एक माहेरवाशीन संस्था म्हणून आधार देत आली आहे, म्हणूनच संस्थेच्या कार्याध्यक्षा प्रा.वर्षा भोसले यांनी ‘विवाहित एकल महिलांचं हक्काचं माहेरघर’ म्हणून संस्थेमार्फत साडी व ५०००/- रूपयांचा धनादेश देऊन संकट काळात धीराचा हात दिला. यांत श्रीमती वैशाली मांडावे, श्रीमती ज्योत्स्ना जाधव, श्रीमती सारिका साठे, श्रीमती श्रद्धा शिंदे, श्रीमती भारती सावंत, श्रीमती स्वाती कांबळे या भगिणींचा समावेश होता.
कोविड काळात दिवसरात्र सेवा देणाऱ्या आणि आपल्या कुटुंबाची किंवा स्वतःची पर्वा न करता सतत आपले कर्तव्य पार पाडणाऱ्या पोलिस दलातील, वैद्यकीय क्षेत्रातील, आरोग्य विभागातील डॉक्टर आणि पत्रकारिता विश्वातील महिलांचा सन्मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन संस्थेच्या वतीने संस्थेच्या कार्याध्यक्षा प्रा. वर्षा भोसले प्रभा पाटील ,वृषाली मगदूम यांनी सत्कार केला. यामध्ये पोलिस दलातील ललिता विजय पवार, मालिनि म्हात्रे, श्रीमती कुंदा ताई शिंदोटे. वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. प्रियांका पाटील, डॉ. राजश्री मांढरे, डॉ. हर्षाली सरगर पत्रकारिता क्षेत्रातील स्वप्ना हरळकर, पद्मजा जांगडे, प्रिया भुजबळ, आरोग्य विभागातील सफाई कामगार दिशा म्हात्रे, रेखा सेजवल, छाया पाटील या महिलांचा सन्मान करण्यात आला.
सन्मानाला उत्तर देताना त्यांनी समाधान आणि आनंद व्यक्त केला,
नवदुर्गा सन्मान सोहळ्याचे औचित्त साधून महिलांचा ताण तणाव दूर करण्यासाठी “‘ति’चा संवाद” हा महिलांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी समुपदेशक व जीविका प्रशिक्षण संस्थेच्या संस्थापक श्रीमती कुमुद प्रियदर्शी प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. सध्यपरिस्थितीत ताण तणावापासून दूर राहून बोलते व्हा, आणि संकटकाळात खचून न जाता स्वतःतील क्षमता ओळखून नव्या संधींचा शोध घ्या असे श्रीमती कुमुद प्रियदर्शी यांनी महिलांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनिषा भोसले वाघ यांनी केले, यावेळी संस्थेच्या… उपसचिव फुलंन शिंदे रूचिका घाडगे, अनिता निकम उमा इंगवले, रेखा तांबेवाघ, डॉ.मयुरी, रेखा अहीवले, जया कुदळे उपस्थित होत्या.