महाराष्ट्र

खासदार राजन विचारे यांनी ठाणे व नवी मुंबईतील रेल्वेच्या समस्या बाबत केली चर्चा

खासदार राजन विचारे यांनी मध्य रेल्वे महाव्यवस्थापक यांच्या दालनात आयोजित केलेल्या बैठकीत ठाणे व नवी मुंबईतील रेल्वेच्या समस्या बाबत केली सविस्तर चर्चा.

प्रतिनिधी – खासदार राजन विचारे यांनी नव्याने नियुक्ती झालेल्या मध्य रेल्वे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांच्या दालनात ठाणे व नवी मुंबई रेल्वे स्थानकातील रेल्वे प्रवाशांच्या समस्यांबाबत मध्य रेल्वे, एम एम आर डी ए, ठाणे महानगरपालिका या विभागांच्या अधिकाऱ्यांच्या समवेत मंगळवार दि. २८ सप्टेंबर २०२१ रोजी बैठक संपन्न झाली. त्यावेळी खासदार राजन विचारे, मध्य रेल्वे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी, मुख्य अभियंता अश्वनी सक्सेना, मध्य रेल्वेचे रेल्वे प्रबंधक शलभ गोयल, एम आर व्ही सी चे व्यवस्थापकीय संचालक रवी अग्रवाल तसेच रेल्वेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी मनोजकुमार शर्मा, एम एम आर डी ए चे अभियंता सुर्वे, ठाणे महापालिकेचे उपनगर अभियंता पापळकर उपस्थित होते.

सदर बैठकीत खासदार राजन विचारे यांनी सर्वप्रथम ठाणे हायवे पूर्व द्रुतगती महामार्गावरील रेल्वे कोपरी पुलाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाबाबत विचारणा केली असता सदर तयार झालेला पुल खुला केल्यानंतरच दुसऱ्या टप्प्यातील रेल्वे पुलाची गर्डर काढून त्या ठिकाणी नवीन गर्डर बसवून पूल ९ महिन्यात पूर्ण करून देऊ. असे आश्वासन रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी खासदार राजन विचारे यांना दिले. त्यानंतर ठाणे पूर्व कोपरी येथे सुरू असलेल्या सॅटीस २ प्रकल्पाचे स्टेशन परिसरात काम सुरू न झाल्याने चर्चा करीत असताना रेल्वेने समझोता करार तातडीने करून घेण्याचे सांगण्यात आलेले आहे. सदर करारनामा मध्ये रेल्वेची जबाबदारी व ठाणे स्मार्ट सिटी यांची जबाबदारी याबाबत ठाणे महानगरपालिका व इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अथोरिटी यांच्या दरम्यान समझोता करार आठवडाभरात करून देण्याचे आश्वासन ठाणे महापालिकेचे उपनगर अभियंता पापळकर यांनी रेल्वे महाव्यवस्थापक यांना दिले.

ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांचा अतिरिक्त वाढलेला भार कमी करण्यासाठी आवश्यक असलेला ठाणे-मुलुंड दरम्यान नवीन रेल्वे स्थानकाच्या कामासंदर्भात चर्चा करीत असताना रेल्वे महाव्यवस्थापक यांनी या नव्याने होणाऱ्या रेल्वेस्थानकाच्या आराखडा अंतिम मंजुरीसाठी रेल्वेचे अधिकारी व ठाणे महापालिकेच्या स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांच्या सोबत बसून अंतिम निर्णय घ्यावा असे रेल्वे महाव्यवस्थापक यांनी म्हटले.

खासदार राजन विचारे यांनी ठाणे रेल्वे स्थानकाच्या मुंबई व कल्याण दिशेस ठाणे महापालिकेने निधी उपलब्ध केलेल्या पादचारी पुलाच्या कामाची विचारणा केली असता याचे काम सुरू असून ठाणे महानगरपालिकेने दुसऱ्या टप्प्यातील रेल्वे फंड वर्ग करावा. जेणेकरून या कामाला गती मिळू शकेल. तसेच खासदार राजन विचारे यांनी रेल्वे स्थानकातील अपूर्ण अवस्थेत ठेवलेला पार्किंग प्लाझा व रेल्वे वसाहतीतील धोकादायक ठरलेल्या इमारती तोडून त्यावर नवीन पार्किंग प्लाझा उभी करण्याच्या मागणी बाबत विचारणा केली असता. रेल्वेने निविदा प्रक्रिया केली असून त्याला प्रतिसाद न मिळाल्याने हे काम रखडल्याची माहिती दिली आहे. तसेच रेल्वे मार्फत पुन्हा याची निविदा प्रक्रिया सुरू करणार आहे अशी माहिती रेल्वे महाव्यवस्थापकांनी खासदार राजन विचारे यांना दिली. पार्किंग प्लाझा व ठाणे रेल्वे स्थानकात धोकादायक झालेल्या इमारतीसाठी मंजूर झालेला निधी कोणत्याही इतर कामासाठी वापरू नका जेणेकरून या कामास विलंब लागेल अशा सूचना खासदार राजन विचारे यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

मध्य रेल्वे मार्गावरील रेल्वेच्या संख्येत वाढ करण्यासाठी एम आर व्ही सी मार्फत सुरु असलेल्या ५ व्या व ६ व्या लाईन च्या कामाबाबत चर्चा करीत असताना सदर काम जानेवारी २०२२ पर्यंत पूर्ण करून देण्याचे आश्वासन रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून खासदार राजन विचारे यांना दिले. तसेच खासदार राजन विचारे यांनी मध्य रेल्वे मार्गावरील १५ डब्यांची लोकल केव्हा पासून सुरू करता यावर विचारणा केली असता. कल्याणच्या पुढील स्टेशनच्या कामास नुकतीच मंजुरी मिळाली असून जोपर्यंत ती कामे पूर्ण होत नाहीत तोपर्यंत १५ डब्यांची लोकल सुरू करता येणार नाही. खासदार राजन विचारे यांनी ठाणे रेल्वे स्थानकापर्यंत तरी १५ डब्यांची लोकल सुरु करावी अशी मागणी त्या वेळी केली. असता याबाबत निर्णय घेऊन आम्ही तुम्हाला कळवू असे रेल्वे महाव्यवस्थापक यांनी सांगितले. त्याचबरोबर रेल्वे स्थानकात फलाटावर बंद पडलेल्या जल शुद्धीकरण यांत्राबाबत विचारणा केली असता नुकताच रेल्वे बोर्डाने आय आर सी टी सी यांना रेल्वे बोर्डाकडून मंजुरी मिळाली असून त्याची निविदा प्रक्रिया १५ दिवसात होणार असल्याचे सांगण्यात आलेले आहे.

मासिक पास काढलेल्या रेल्वे प्रवाशांना पुन्हा पुन्हा २ डोस (लसीकरण) घेतलेले प्रमाणपत्र (सर्टिफिकेट) मागण्यात येते यावर लवकरच विचार करून प्रवाशांना त्रास होणार न%

Related Articles

Back to top button