उरण येथे खाद्य पदार्थ खाल्याने लहान मुलांना विषबाधा
उरण (दिनेश पवार) : उरण तालुक्यातील केगाव हददीतील विनायक डोंगर आळी येथे एकाच कुटुंबातील ७ मुलांना चायनीज फ्रायड राईस खाल्य्याने विष बाधा झाली. त्यांना उरण येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आता सर्वांची तब्बेत ठिक आहे.
विषबाधा झालेल्या मुलांची नावे कु. अर्णव पाटील वय ०९, सिद्धार्थ ठाकूर वय १०, कु. सानिया सुनिल म्हात्रे वय १५, कु. आर्या सुनिल म्हात्रे वय ७, कु. स्त्री, श्रीमती रिता ठाकूर वय ३८, स्त्री कु. सिया निळकमल थळी वय ९ आदींना विषबाधा झाली आहे.
उरण तालुक्यातील केगाव ग्रामपंचायत हददीतील विनायक डोंगर आळी राहणारे नथुराम पाटील यांच्या घरी गणपती सणाच्या निमित्ताने पाहुणे आणि नातेवाईक आहे होते. बुधवारी रात्री ९ च्या सुमारास उरण शहातील चायनीजच्या गाडीवरून चायनीज फ्राईड राईस आणले होते. ते पाहुण्यातील ७ लहान मुलांनी खाल्ले त्यानंतर थोड्याच वेळेत मुलांना उलट्या होऊ लागल्या त्यांना उरण येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सदर ७ हि मुले व्यवस्थित असल्याचे इंदिरागांधी ग्रामीण रुग्णालयाचे वैदकीय अधीक्षक डॉ. देसाई यांनी सांगितले.
नथुराम पाटील यांच्या कुटुबीयांनी चायनीज टपरी मालका विरुद्ध मोरा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. बुधवार रात्री ११ वाजता सदर विनायक डोंगरआळी येथील एकाच कुटुंबीयांनी चायनीज फ्रीईड राईस खाल्ल्यामुळे ७ मुलांना विष बाधा झालेली आहे.सदर ७ मुलांची तब्बेत सध्या चांगली आहे. कोणत्याही प्रकारचा मुलांना त्रास होत नाही त्यांच्यावर औषधोपचार चालू आहेत असे डॉ. गौतम देसाई ह्यांनी सांगितले.