नवी मुंबई

कोव्हीड केंद्रे पुन्हा सुरू करण्याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेत कंत्राटी स्वरूपात मनुष्यबळाची भरती

कोव्हीडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोना बाधितांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी तातडीने नियोजनबध्द पावले उचलण्यास सुरूवात केली असून तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आलेली कोव्हीड केंद्रे टप्प्याटप्प्याने पुन्हा कार्यान्वित करण्यास सुरूवात झालेली आहे.
यासाठी गरजेचे असलेले मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्याच्या दृष्टीने विविध आवश्यक पदांसाठी कंत्राटी स्वरूपात मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्याच्या प्रक्रियेसही सुरूवात करण्यात आलेली आहे. यापूर्वी आरोग्य विभागांतर्गत प्रतिमहा ठोक मानधनावर कंत्राटी (करार) पध्दतीने पात्र व इच्छुक उमेदवारांचे मनुष्यबळ तात्पुरत्या स्वरुपात उपलब्ध करुन घेणेकरीता 17 जुलै 2020 रोजी जाहिरात क्रमांक 03/2020 प्रसिध्द करण्यात आलेली होती. ही जाहिरात तसेच अर्ज सादर करण्याची गुगल लिंक नवी मुंबई महानगरपालिकेच्या  www.nmmc.gov.in या उपलब्ध आहे. ही लिंक दि. 02 एप्रिल 2021 पर्यंत खालील पदांकरिता अर्ज सादर करण्यासाठी खुली असणार आहे.

अ.क्र.

पदनाम

आवश्यक मनुष्यबळाची संख्या

मासिक ठोक एकत्रित मानधन रुपये

1

वैदयकशास्त्र तज्ञ (MD Medicine)

15

2,50,000/-

2

मेडिकल मायक्रोबायोलॉजिस्ट (Medical Microbiologist)

05

2,50,000/-

3

इंटेन्सिव्हिस्ट (Intensivist)

10

2,50,000/-

4

एम.बी.बी.एस.

50

1,00,000/-

बी.ए.एम.एस.

75

75,000/-

बी.एच.एम.एस.

40

60,000/-

बी.यू.एम.एस.

10

60,000/-


5

स्टाफ नर्स (Staff Nurse)

200

45,000/-

6

प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Lab Technician)

20

30,000/-

7

कनिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Junior Lab Technician)

15

20,000/-

8

ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ (ANM)

40

35,000/-

9

बेडसाईड सहाय्यक (Bedside Assistant)

40

20,000/-

    यामध्ये यापूर्वी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी पुन्हा अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही. उमेदवारांना गुणवत्तेप्रमाणे व महानगरपालिकेच्या आवश्यकतेनुसार कागदपत्रे पडताळणीसाठीचा दिनांक व वेळ ई-मेल / एस.एम.एस. व्दारे कळविण्यात येत आहे. पदसंख्येमध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्याचा अधिकार महापालिका आयुक्त यांना असणार असून नियुक्तीबाबतच्या इतर अटी / शर्ती, मानधन व विशेष सूचना जाहिरात क्रमांक 03/2020 नुसार कायम राहतील याची संबंधितांनी नोंद घ्यावयाची आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button