ऐरोली विभागातील अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील जी विभाग ऐरोली अंतर्गत सेक्टर 09 येथील घर क्र. 153, दिवेगांव मच्छीमार्केटजवळ जी + 1 इमारतीचे बांधकाम नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे सुरु केले होते. या अनधिकृत बांधकामास ऐरोली विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजाविण्यात आलेली होती. संबधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविणे आवश्यक होते. परंतु त्यांनी अनधिकृत बांधकाम सुरु ठेवेले होते.
या अनधिकृत बांधकामावर ऐरोली विभागामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करुन करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. या धडक मोहिमेसाठी 01 जेसीबी, 06 मजूर, 01 गॅसकटर, 02 इलेक्ट्रीक हॅमर व जी विभाग ऐरोली येथील अधिकारी/कर्मचारी तसेच अतिक्रमण विभागाकडील आणि रबाले पोलिस ठाणे येथील पोलिस पथम तैनात होते.
यापुढे देखील अशा प्रकारे कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.