पाचव्या दिवसाच्या विसर्जन सोहळ्यात 13109 श्रीगणेशमूर्ती व 1780 गौरींचे भावपूर्ण विसर्जन, नागरिकांच्या प्रतिसादामुळे यशस्वी झाला कृत्रिम तलावांचा नवी मुंबई पॅटर्न
दीड दिवसाप्रमाणेच पाचव्या दिवशीही 22 मुख्य विसर्जनस्थळे व 151 कृत्रिम विसर्जनस्थळांवर नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या सुयोग्य नियोजनामध्ये 12985 घरगुती आणि 124 सार्वजनिक अशा एकूण 13109 श्रीगणेशमूर्तींचे तसेच 1780 गौरींचे विसर्जन भावपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
कोव्हीड 19 च्या कालावधीत संपन्न होत असलेल्या यावर्षीच्या श्रीगणेशोत्सवात नवी मुंबईकर नागरिकांनी शासन, प्रशासनाने केलेल्या आवाहनास अनुसरून स्वयंशिस्तीचे पालन करीत जागरूक व जबाबदार नागरिकत्वाचे सर्वच विसर्जन स्थळांवर दर्शन घडविले.
यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने बनविण्यात आलेल्या विभागाविभागातील आपल्या घराजवळच्या कृत्रिम तलावांमध्ये श्रीमूर्ती विसर्जन करण्यास प्राधान्य देत नागरिकांनी सोशल डिस्टन्सींगच्या नियमांचे पालन केलेच शिवाय पर्यावरणपूरक संदेशही स्वत:च्या कृतीतून दिला. नागरिकांनी मुख्य विसर्जन तलावाच्या बाजूच्या कृत्रिम तलावात विसर्जन करण्यास पसंती दिल्याचे चित्र दीड दिवसांच्या विसर्जन सोहळ्याप्रमाणेच पाचव्या दिवशीही पहायला मिळाले. 22 पारंपारिक विसर्जन तलावांत 5391 घरगुती व 71 सार्वजनिक अशा 6002 श्रीगणेशमूर्तींचे व 494 गौरींचे विसर्जन संपन्न झाले. तसेच 151 कृत्रिम तलावात 7594 घरगुती तसेच 53 सार्वजनिक अशा एकूण 7647 श्रीमूर्तींचे व 1286 गौरींचे विसर्जन करण्यात आले.
पाचव्या दिवसाच्या विसर्जनामध्ये –
बेलापूर विभागात – 5 विसर्जन स्थळांवर 1535 घरगुती व 12 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती व 75 गौरी,
नेरूळ विभागात – 2 विसर्जन स्थळांवर 1434 घरगुती व 11 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती व 61 गौरी,
वाशी विभागात – 2 विसर्जन स्थळांवर 649 घरगुती व 03 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती व 37 गौरी
तुर्भे विभागात – 3 विसर्जन स्थळांवर 667 घरगुती व 09 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती व 69 गौरी,
कोपरखैरणे विभागात – 2 विसर्जन स्थळांवर 101 घरगुती व 02 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती व 11 गौरी,
घणसोली विभागात – 4 विसर्जन स्थळांवर 303 घरगुती व 25 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती व 133 गौरी,
ऐरोली विभागात – 3 विसर्जन स्थळांवर 702 घरगुती व 09 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती व 108 गौरी,
दिघा विभागात – 1 विसर्जन स्थळांवर 0 घरगुती व 0 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती व 00 गौरी,
अशाप्रकारे एकुण 22 विसर्जन स्थळांवर 5391 घरगुती व 71 सार्वजनिक अशा एकूण 6002 श्रीगणेशमुर्तींचे व 494 गौरींचे विसर्जन भावपूर्ण वातावरणात करण्यात आले.
त्याचप्रमाणे, यावर्षी मोठ्या प्रमाणात तयार करण्यात आलेल्या 151 कृत्रिम विसर्जन स्थळांवर ,
बेलापूर विभागात – 21 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 427 घरगुती व 07 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती व 69 गौरी,
नेरूळ विभागात – 27 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 596 घरगुती व 05 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती व 125 गौरी,
वाशी विभागात – 18 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 450 घरगुती व 04 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती व 70 गौरी,
तुर्भे विभागात – 20 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 564 घरगुती व 09 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती व 53 गौरी,
कोपरखैरणे विभागात – 16 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 2545 घरगुती व 13 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती व 609 गौरी,
घणसोली विभागात – 17 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 1188 घरगुती व 05 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती व 222 गौरी,
ऐरोली विभागात – 23 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 1195 घरगुती व 07 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती व 87 गौरी,
दिघा विभागात – 9 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 629 घरगुती व 03 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती व 51 गौरी,
तात्पुरत्या स्वरूपात निर्मिती करण्यात आलेल्या एकूण 151 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 7594 घरगुती व 53 सार्वजनिक अशा एकूण 7647 श्रीगणेशमुर्ती आणि 1286 गौरींना भावपूर्ण निरोप देत विसर्जन करण्यात आले.
अशाप्रकारे, नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पाचव्या दिवशी 12985 घरगुती व 124 सार्वजनिक अशा एकूण 13109 श्रीगणेशमूर्तींचे व 1780 गौरींचे भक्तीपूर्ण विसर्जन संपन्न झाले.
विशेष म्हणजे नागरिकांना सुलभपणे विसर्जन करता यावे यासाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या nmmc.visarjanslots.com या ‘ऑनलाईन श्रीगणेशमूर्ती विसर्जन स्थळ नोंदणी’ च्या विशेष पोर्टललाही उत्तम प्रतिसाद देत 595 नागरिकांनी त्यावर आपले विसर्जनसाठीचे ऑनलाईन स्लॉट बुकींग केले.
श्रीमूर्ती व गौरी विसर्जनाकरिता महानगरपालिका आठही विभाग कार्यालयांच्या वतीने संपूर्ण व्यवस्था नियोजनबध्दरित्या कार्यरत होती. विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासह अग्निशमन विभाग आणि विसर्जनासाठी नियुक्त केलेले स्वयंसेवक, लाईफ गार्डस् यांच्या माध्यमातून विसर्जन व्यवस्था सुरळीत पार पडली. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त चोख होता.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने यापुढील काळातील सात दिवसांचे तसेच अनंतचतुर्दशीदिनी होणारे दहा दिवसांचे विसर्जन याप्रसंगीही अशाच प्रकारे नियोजन करण्यात आलेले असून विसर्जन सोहळा सुव्यवस्थित रितीने पार पाडण्यासाठी नागरिकांनी नवी मुंबई महानगरपालिकेस संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.