नवी मुंबई
डॉ. विशाल माने (प्रभारी अधिकारी, पासपोर्ट विभाग) आणि श्री. रुपाली अंबुरे (पोलीस उपायुक्त, विशेष शाखा) यांचे मार्गदर्शन:
मा. रुपाली अंबुरे, पोलीस उपायुक्त, विशेष शाखा यांच्या आदेशाने आज नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील सर्व २० पोलीस ठाणे स्तरावर गोपनीय कामकाज करणाऱ्या पोलीस अंमलदार (एकूण ४६) यांची बैठक आयोजित करून त्यांना पासपोर्ट, चारित्र्य पडताळणी, परदेशी नागरिक या विभागांशी संबंधित कामकाजाबाबत आणि विहित वेळेत प्रकरणे निर्गती करून नागरिकांशी सौजन्याने वागण्याबाबत डॉ विशाल माने, प्रभारी अधिकारी, पासपोर्ट विभाग आणि श्री. रुपाली अंबुरे, पोलीस उपायुक्त यांनी मार्गदर्शन केले.
तसेच पारपत्र विभाग, विशेष शाखेकडून सर्व पोलीस ठाणेस एक वर्षाकरीता २४@७ कोर्ट चेकर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. पासपोर्ट ऑनलाईन प्रणालीवर नवीन पनवेल पोलिस ठाणे हे नाव बदलून पनवेल तालुका पोलीस ठाणे असे करण्यासाठी पाठपुरावा करून बदल करण्यात आला.