महाराष्ट्र
कामोठेत मनसे महाराष्ट्र उपाध्यक्ष महेश जाधव ह्यांच्याकडून दहीहंडी साजरी:
ह्यावर्षी पण दहीहंडी सण साजरा करू नये म्हणून सरकारने मनाई केली होती. परंतु मनसेकडून ठिकठिकाणी दहीहंडी फोडण्यात आली.
नवी मुंबईतील कामोठे येथे मनसे महाराष्ट्र उपाध्यक्ष महेश जाधव यांच्याकडून दहिहंडी सण साजरा करण्यात आला. पोलीस प्रशासनाचा विरोध जुगारून मनसे कडून दहिहंडी साजरी करण्यात आली. यावेळी पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
नवी मुंबई वार्ताशी बोलताना मनसे महाराष्ट्र उपाध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले कि, “दहीहंडी हा सण आम्ही साजरा करणार आणि यापुढे हि साजरा करत राहणार. सरकारने कितीही विरोध दर्शविला या जोरजबरदस्ती केली किंवा आमच्यावर गुन्हे टाकले तरी आम्ही दहीहंडी हा सण साजरा करणारच.”