नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पत्रकारांकरीता विशेष लसीकरण सत्र संपन्न
कोव्हीड विरोधी लढ्यामध्ये प्रसारमाध्यमांनी नागरिकांपर्यंत योग्य माहिती पोहचविण्यामध्ये दिलेले महत्वपूर्ण योगदान लक्षात घेऊन 29 मे 2021 रोजी विविध वृत्तपत्रे व वृत्तचित्रवाहिन्या यांचे प्रतिनिधी व कॅमेरामन यांच्या करीता महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आलेले होते.
या लसीकरणात पहिला डोस देऊन विहीत कालावधी पूर्ण झाल्याने नवी मुंबई महानगरपालिकेच्या सेक्टर 15 नेरुळ येथील माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालयात कोव्हीशिल्ड लसीचा दुसरा डोस देण्यासाठी आज आयोजित करण्यात आलेल्या विशेष लसीकरण सत्रात 54 वृत्तपत्रे व वृत्तचित्रवाहिन्या यांचे प्रतिनिधी व कॅमेरामन यांनी कोव्हीड लसीचा दुसरा डोस घेतला. त्याचप्रमाणे त्यांच्या 16 कुटुंबियांचेही लसीकरण करण्यात आले.
प्रसारमाध्यमांची महत्वाची भूमिका लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेने आयोजित केलेल्या विशेष लसीकरण सत्राबद्दल माध्यम प्रतिनिधी व कॅमेरामन यांनी समाधान व्यक्त केले