घणसोली व कोपरखैरणे विभागातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई
नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील घणसोली विभाग अंतर्गत साईकृपा अपार्टमेंटजवळ, समर्थनगर – डि मार्ट, रस्त्याशेजारी, घणसोली नवी मुंबई येथे अनधिकृतपणे आरसीसी फुटींगचे बांधकाम पूर्ण, जोत्याचे काम अनधिकृत बांधण्यात येत होते. याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही पूर्व परवानगी न घेता हे बांधकाम अनधिकृतपणे सुरु केले होते. त्याचप्रमाणे भु.क्र.28, सेक्टर-06 घणसोली याठिकाणीही नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही पूर्व परवानगी न घेता तिसऱ्या मजल्याचे ओपन टेरेस कव्हर करण्यात आले होते. सदर बांधकामांस घणसोली विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजावण्यात आलेली होती. संबंधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविणे आवश्यक होते. परंतू त्यांनी सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरू ठेवले होते. या धडक मोहिमेसाठी घणसोली विभागाकडील अधिकारी/कर्मचारी, मजुर 18, ब्रेकर 04, गॅसकटर 06 तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलिस पथक तैनात होते.
त्याचप्रमाणे कोपरखैरणे विभाग अंतर्गत 1) सफल योग को.ऑफ हाऊसिंग सोसायटी, प्लॉट नं.27/A, से.11, कोपरखैरणे, 2) गुलमोहर को.ऑफ हाऊसिंग सोसायटी, प्लॉट नं.27/B, से.11 कोपरखैरणे, 3) गोकुळधाम को.ऑफ हाऊसिंग सोसायटी, प्लॉट नं.86, से.11 कोपरखैरणे याठिकाणी महानगरपालिकेची कोणतीही पुर्व परवानगी न घेता अनधिकृतपणे बांधकाम सुरू केले होते. या अनधिकृत बांधकामांस कोपरखैरणे विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 मधील कलम 53(1) अन्वये नोटीस बजावण्यात आलेल्या होत्या. परंतु सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम केले होते. सदर बांधकाम पोलीस बंदोबस्तामध्ये निष्कसित करण्यात आले.
यापुढे देखील अशा प्रकारे कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.