एलजीच्या मुंबई, ठाणे विभागातील ३८ व्या ब्रँड शॉपचे दिमाखात उद्घाटन, ग्राहकांसाठी अत्याधुनिक आणि नाविन्यपूर्ण उत्पादनांची शृंखला
नवी मुंबई : नवनवीन गॅजेट्स आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील लोकप्रिय कंपनी एलजी इलेक्ट्रॉनिक्सने बेलापूर, नवी मुंबई येथे शनिवार २१ ऑगस्ट रोजी त्यांच्या ३८व्या ब्रँड शॉपचे उद्घाटन केले. सध्याच्या अत्याधुनिक युगात ग्राहकांचा खरेदीचा अनुभव सुखकर, सुरळीत करत त्यांना आवडीची, उत्तम दर्जाची उत्पादने एकाच ठिकाणी घेता यावीत या उद्देशाने या शॉपची रचना करण्यात आली आहे. इलेक्ट्रॉनिक्स रिटेलमधील देव शर्मा आणि विमल शर्मा यांच्या ‘आर्सी इलेक्ट्रॉनिक्स’ या लिडिंग ग्रुप असणाऱ्या भागीदारसह ‘एलजी बेस्ट शॉप’ एम/एस आर्सी इलेक्ट्रॉनिक्स, सेक्टर १५ बेलापूर येथे शॉपचे उद्घाटन एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या पश्चिम विभागाचे सेल्स प्रमुख सुरिंदर सचदेवा आणि प्रादेशिक व्यवसाय प्रमुख आरिफ खान यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी नवी मुंबई व्यापारी महासंघाचे महासचिव प्रमोद जोशी, लोकप्रिय गायक आणि लाईव्ह परफॉर्मर मनमीत सिंग यांची विशेष उपस्थिती होती.
देशभरातील विविध शहरांत एक्सक्लुसिव्ह प्रिमिअम शोरूम्सचा विस्तार करण्यावर एलजीचा भर आहे, जेणेकरून ग्राहकांना सर्वोत्तम आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची उत्पादने खरेदी करता येतील.
”नाविन्यता, गुणवत्ता आणि उत्कृष्टता या मूल्यांचा विचार करत आम्ही ग्राहकांसाठी उत्पादनांची निर्मिती करत आलो असून हे शॉप एलजी ब्रँडची मूल्ये दर्शविते. ग्राहकांसाठी उत्तमोत्तम सेवा प्रदान करणे हा आमचा मुख्य उद्देश असून त्यांचा आमच्या ब्रँडवर असणारा विश्वास फार मोलाचा आहे. त्यांच्या आमच्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या लक्षात घेता आम्हाला आशा आहे की, एलजीची नाविन्यपूर्ण उत्पादने त्यांना निश्चित आवडतील आणि हे वर्ल्ड क्लास एलजी ब्रँड शॉप खरेदीचा सर्वोत्तम अनुभव देईल.” असे एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाच्या पश्चिम विभागाचे सेल्स प्रमुख सुरींदर सचदेवा म्हणाले.
”एक गायक असल्याने मला गॅजेट्स आणि टेक्नॉलॉजीची फार आवड आहे. ‘एलजी बेस्ट शॉप’ च्या उद्घाटन प्रसंगी मी TONEFree या भारतातील पहिल्या ९९.९ टक्के बॅक्टेरिया फ्री UV इअरबड्सचे उद्घाटन करत त्यांचा अनुभवही घेतला. हे युनिक इअरबड्स असून त्यातील UV टेक्नॉलॉजी ९९.९ टक्के बॅक्टेरिया नष्ट करते. आवाजाची उत्तम क्वालिटी असल्याने गाण्याचा आनंद अधिकच घेता आला. त्यामुळे गाण्यांची आवड असणाऱ्या प्रत्येकाला मी हे इअरबड्स वापरण्याचा सल्ला नक्कीच देईन.” असे लोकप्रिय गायक आणि लाईव्ह परफॉर्मर मनमीत सिंग म्हणाला.