क्राइम

कोव्हिशिल्ड लशीचा काळाबाजार करणाऱ्या इसमास पनवेल गुन्हे शाखेकडून अटक

मागील एक वर्षांपासून देशात कोरोनाचा प्रादुर्भाव चालू असून त्याच्याशी शासन आणि जनता लढत असताना काही समाजकंटक लाभ उठवीत आहेत. यापूर्वी ही पनवेल गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक गिरीधर गोरे व त्यांच्या टीमने अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. शेखर पाटील, पो. उप. आयुक्त प्रवीण पाटील, सहा. पो. आयुक्त विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली रेम्डिसिव्हरचा काळाबाजर करणारे व आर.टी.पी.सी.आर. चा बनावट रिपोर्ट तयार करणाऱ्या समाजकंटक लोकांविरुद्ध कारवाई केली आहे.

सध्या देशभरामध्ये कोविड-१९ या विषाणूचा प्रादुर्भाव होत असल्याने सदरच्या प्रादुर्भावची तिसरी लाट रोखण्यासाठी देशभरामध्ये लसीकरण मोहीम राबवली जात आहे. काही लोक हे कोविड-१९ वर मिळणारी कोविशिल्ड लसीचा काळाबाजार करीत असल्याबाबत माहिती मिळाल्याने मा. पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंग, मा. अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. शेखर पाटील, पोलीस उप आयुक्त गुन्हे प्रवीण पाटील यांनी सदर इसमांवर कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशित केले होते.

गुन्हे शाखा कक्ष ०२, नवी मुंबईचे पोलीस उप निरीक्षक वैभव रोंगे यांना मिळालेल्या माहितीनुसार इसम नामे किशोर कुमार खेत, रा. ठी. कामोठे, रायगड हा राजीव गांधी ब्रिज सेक्टर ०८, नेरूळ नवी मुंबई येथे कोविशिल्ड लस बेकायदेशीररित्या स्वतःच्या फायद्याकरिता विक्री करत असल्याबाबत माहिती मिळाल्याने मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हेसो यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक गिरिधर गोरे यांच्या नेतृत्वाखाली औषध निरीक्षक श्री. अजय माहुले यांच्यासह सदर ठिकाणी सापळा लावून नमूद इसम हा बोगस गि-हाईकास कोविशिल्ड लसीचे १५ डोस हे ऐकुन ६०,००० रु. विक्रि करीत असताना एकूण दोन व्हाईल्स सह मिलुन आला. सदर इसमास त्याब्यात घेवून औषध निरीक्षक श्री. अजय माहुले यांच्या तक्रारी वरून नेरूळ पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. क्र. २९५/२०२१ भादवि कलम ४२० सहा कलम औषध किंमत नियंत्रण आदेश कलम परिच्छेद २६, जीवनावश्यक वस्तू कलम ३, औषध व सौंदर्या प्रसाधन कायदा कलम १८, २७ अन्वये गुन्हा नोंद करून आरोपी किशोर कुमार खेत वय २१ वर्ष धंदा-बेकार, रा. ठी. महादेव सोसायटी, रूम नं-२०४ सेक्टर ३६, कामोठे, रायगड. मुळगाव किसन पुरा, तालुका मारवाड, जिल्हा राज समध, राज्य राजस्थान यास अटक करण्यात आली आहे.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शाखा कक्ष ०२ नवी मुंबई करीत आहोत. सदर कारवाईत पो. उप. नि. रोंगे, पाटील, स.पो. उपनि. साळुंखे, पो.ह. अनिल पाटील, सचिन पवार, सचिन म्हात्रे, सुनील कुदले, संजय पाटील, इद्रजित कानू, वाघ, काटकर, प्रफूल मोरे, गडगे, सूर्यवंशी, भोपी भाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button