नवी मुंबई
अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त ओमकार अपार्टमेंट मध्ये ध्वजारोहण संपन्न:
अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त ओमकार अपार्टमेंट, सेक्टर १५, वाशी येथे सोसायटीचे उपाध्यक्ष संजय अडसुळे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. याप्रसंगी सोसायटीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
सोसायटी मधील रहिवाशी तसेच लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होती. अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सोसायटी मध्ये अल्पोपहार ठेवण्यात आला होता.