नवी मुंबई

आमदार श्री. गणेश नाईक यांच्या स्थानिक विकास निधीतून 8 रूग्णवाहिकांचे लोकार्पण तसेच 9 ग्रंथालयांकरिता स्पर्धात्मक परीक्षा पुस्तके व ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राना साहित्याचेही वितरण

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोव्हीड विरोधी लढ्याला बळ देण्यासाठी ऐरोली विधानसभा सदस्य आमदार श्री. गणेश नाईक यांच्या स्थानिक विकास निधी 2020-21 अंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेल्या 1 अद्ययावत एएलएस (Advance Life Support) आणि 7 पीटीए अशा एकूण 8 रूग्णवाहिकांचा लोकार्पण समारंभ महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते श्री. देवेन्द्र फडणवीस यांच्या शुभहस्ते महापालिका मुख्यालयासमोरील प्रांगणात संपन्न झाला.

यावेळी आमदार श्री. गणेश नाईक यांच्या स्थानिक विकास कार्यक्रम 2019-20 अंतर्गत महानगरपालिकेच्या 9 ग्रंथालयांकरिता एम.पी.एस.सी., यू.पी.एस.सी. तसेच इतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांकरीता 4887 पुस्तके देण्यात आली.

त्याचप्रमाणे, ऐरोली विधानसभा कार्यक्षेत्रातील महानगरपालिकेच्या 8 ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रांकरिता वैद्यकीय साहित्य संच, खेळाचे साहित्य, करमणुकीचे साहित्य, अग्निसंरक्षक साधने, फर्निचर असे विविध प्रकारचे साहित्यही आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत उपलब्ध करून देण्यात आले.

याप्रसंगी ऐरोली विधानसभा सदस्य आमदार श्री.गणेश नाईक, बेलापूर विधानसभा सदस्य आमदार श्रीम. मंदाताई म्हात्रे, विधानपरिषद सदस्य आमदार श्री. रमेश पाटील, महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button