नवी मुंबई

7 लाखाहून अधिक नवी मुंबईकरांनी घेतला कोव्हीड लसीचा पहिला डोस

कोव्हीड लसीच्या उपलब्धतेनुसार जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करून त्यांना संरक्षित करण्यासाठी दैनंदिन लसीकरणाचे योग्य नियोजन करण्याकडे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने लक्ष दिले जात आहे. आत्तापर्यंत 7 लाखाहून अधिक नागरिक कोव्हीड लसीचा पहिला डोस घेत संरक्षित झाले आहेत.

नागरिकांना त्यांच्या घरापासून जवळच लस घेणे सुविधाजनक व्हावे याकरिता महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार सद्यस्थितीत 91 लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. तसेच यापुढील काळात अधिक प्रमाणात लस उपलब्ध झाल्यास कोव्हीड लसीकरणाला वेग देण्यासाठी शंभरहून अधिक लसीकरण केंद्रे सुरू करण्याचे संपूर्ण नियोजन करण्यात आलेले आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेची लसीकरण केंद्रे व खाजगी रूग्णालयांतील केंद्रे याठिकाणी 7 लाख 1 हजार 939 नागरिकांनी कोव्हीड लसीचा पहिला डोस घेतला असून 2 लक्ष 37 हजार 513 नागरिकांनी कोव्हीड लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत.

यामध्ये –

– म्हणजेच एकूण 9 लक्ष 39 हजार 452 कोव्हीड लसीचे डोस देण्यात आलेले आहेत.

कोव्हीडच्या संभाव्य तिस-या लाटेपूर्वी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे याकरिता नवी मुंबई महानगरपालिका प्रयत्नशील असून ज्यांनी लसीचा पहिला डोस घेतलेला आहे त्यांना विहित कालावधीत दुसरा डोस उपलब्ध करून देण्याची काळजी घेतली जात आहे तसेच 45 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला प्राधान्य दिले जात आहे.

कोव्हीड लसीकरण हे कोरोनाची लागण झाल्यास त्याची तीव्रता कमी करण्यासाठी लाभदायी आहे. मात्र कोव्हीड होऊच नये याकरिता मास्कचा नियमित वापर, चेह-याला कोठेही स्पर्श न करणे, सुरक्षित अंतर राखणे, वारंवार हात स्वच्छ करणे असे कोव्हीड अनुरूप वर्तन (Covid Appropriate behaviour) आपली सवय बनविणे अत्यंत गरजेचे आहे.

सध्या कोरोनाबाधीतांची संख्या काहीशी कमी झाल्याने प्रतिबंधातून काही प्रमाणात सवलत देण्यात आली असली तरी त्या सवलतीचा कोव्हीड नियमांच्या चौकटीत राहूनच लाभ घ्यावा व कोव्हीड नियमांचे उल्लंघन करून कोरोनाला निमंत्रण देऊ नये असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button