मनोरंजन

स्टोरीटेलवर फ्रीडम ऑफर!

ऑगस्ट, २०२१: स्टोरीटेल ही जगातील सर्वाधिक ऑडिओबुक्स निर्माण करणारी आघाडीची संस्था आहे. भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य उत्सवा निमित्त ‘स्टोरीटेल’ने सब्स्क्रिप्शन प्लानमध्ये ‘स्टोरीटेल सिलेक्ट फ्रीडम ऑफर’ जाहीर करून साहित्यरसिकांचा आनंद द्विगुणित केला आहे. इंग्रजीसह ११ भारतीय प्रादेशिक भाषांमधे दर्जेदार ऑडिओबुक्स निर्मितीत अग्रेसर असलेली जगविख्यात ‘स्टोरीटेल’ ऑडिओबुक संस्था अनोख्या पद्धतीने हा उत्सव साजरा करीत आहे. मराठीतील हजारो सर्वोत्तम पुस्तके कुठेही कधीही ऐकण्याचे स्वातंत्र्य अनुभवण्यासाठी मर्यादित कालावधीसाठी ‘स्टोरीटेल सिलेक्ट फ्रीडम ऑफर’चा लाभ सर्वांना घेता येणार आहे.

सध्याची परिस्थिती पहाता सर्वांकडे तसा मुबलक वेळ आहे. त्यामुळे आपल्या आवडीच्या वेगवेगळया साहित्यकृतींचे वाचनकरण्यासाठी ही अतिशय योग्य संधी म्हणता येईल. ‘स्टोरीटेल सिलेक्ट’ सब्स्क्रिप्शन प्लानचे मूल्य ‘फ्रीडम ऑफर’मध्ये अनुक्रमे रु. ५९ आणि रु. ३४५ असे नाममात्र किंमतीत स्टोरीटेल अॅप उपलब्ध होणार आहे.

‘स्टोरीटेल इंडिया’चे कंट्री मॅनेजर योगेश दशरथ, म्हणतात “या महिन्यात आपण सगळे भारतीय आपला अमृतमहोत्सवी ‘स्वातंत्र्य उत्सव’ दिमाखात साजरा करणार आहोत. स्टोरीटेललाही हा आनंद अविस्मरणीय करायचा आहे. स्टोरीटेलची मूळ संकल्पना अमर्याद अविस्मरणीय ऑडिओबुक्स निर्मितीची असून साहित्यरसिकांसाठी दर्जेदार कथा आम्ही सातत्याने आणीत आहोत. ऑडिओबुक तुम्ही कधीही, कुठे आणि कितीही ऐकू शकत असल्याने मर्यादित काळासाठी असलेल्या ‘फ्रीडम ऑफर’ योजनेचा लाभ अधिकाधिक सभासदांनी घेऊन आपल्या मातृभाषेतील अमर्याद ऑडिओबुक्स ऐकून आपलं अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य वर्ष साजरे करावे.”

स्टोरीटेल ही एक ऑडिओबुक आणि ईबुक अॅप स्ट्रीमिंग सेवा आहे जी भारतात २७ नोव्हेंबर २०१७ रोजी सुरू झाली. कंपनीचे मुख्यालय स्टॉकहोम, स्वीडनमध्ये आहे आणि सध्या जगभरातील २५ देशांमध्ये कार्यरत आहे. भारतात, अॅप सध्या इंग्रजी, हिंदी, मराठी, उर्दू, बंगाली, तमिळ, मल्याळम, तेलगू, आसामी, गुजराती आणि कन्नड या ११भारतीय भाषांमध्ये एकूण २ लाखांहून अधिक ऑडिओबुक आणि ईबुक्स प्रकाशित करते. आमच्या ऑडिओबुक्स साहित्य निर्मितीतून एकापेक्षा एक दर्जेदार साहित्यकृती प्रभावशाली ठरत असून वैचारिक आणि संवेदनशील समाज निर्मितीत ‘स्टोरीटेल’ विशेष भूमिका बजावत आहे. मराठीतील हजारो सर्वोत्तम पुस्तके कुठेही कधीही ऐकण्याचे स्वातंत्र्य अनुभवण्यासाठी आपल्याला स्टोरीटेल ‘गुगल प्ले स्टोअर’ http://bit.ly/2rriZaU आणि ‘iOS अॅप स्टोअर’ https://apple.co/2zUcGkG दोन्हीवर उपलब्ध आहे

स्टोरीटेल बद्दल:
स्टोरीटेल ही जगातील सर्वात मोठी सबस्क्राइब केलेली ऑडिओबुक आणि ईबुक स्ट्रीमिंग सेवांपैकी एक असून जागतिक स्तरावर या संस्थेकडे पाच लाखांपेक्षा जास्त ऑडिओबुक्स आणि ईबुक्स साहित्यरसिकांसाठी उपलब्ध आहेत. आमची दृष्टी जगाला अधिक संवेदनशील आणि सर्जनशील बनवणे असून सर्वश्रेष्ठ कथांच्या माध्यमातून कोणालाही, कोठेही आणि केव्हाही त्याचा आनंद घेता येईल. स्टोरीटेलचा स्ट्रीमिंग व्यवसाय स्टोरीटेल आणि मोफीबो या ब्रँड अंतर्गत चालवला जातो. स्टोरीटेलचे प्रकाशन व्यवसाय क्षेत्र ऑडिओबुक प्रकाशक स्टोरीसाइड आणि नॉर्स्टेड्स, पीपल्स आणि गमेरस सारख्या प्रशंसित नॉर्डिक प्रकाशन संस्थांच्या माध्यमातून चालते. स्टोरीटेल जगभरातील २० हून अधिक देशांमध्ये कार्यरत आहे आणि त्याचे मुख्यालय स्टॉकहोम, स्वीडनमध्ये आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button