चिरनेरच्या सीआरपी व बँक सखी बचत यांनी महाड येथील पूरग्रस्तांना दिला मदतीचा हात
उरण (दिनेश पवार) : महाड तालुक्यात तुफान पाऊस पडला मुसळधार पावसामुळे सावित्री, गांधारी, आणि काळ या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडत महाड शहरासह बिरवाडी औधोगिक परिसरात प्रवेश केला यामुळे पूरस्थिती निर्माण झाली परिणामी शहरातील बैठ्या घरांत आणि दुकानांत पाणी शिरले.
महाड मधील पूरग्रस्तांसाठी उरण तालुक्यातील चिरनेर गावातील सीआरपी शकुंतला देविदास चीर्लेकर, सीआरपी सोनाली संतोष जाधव व बँक सखी अंजली रवींद्र चीर्लेकर त्याचप्रमाणे जाणता राजा महिला ग्रामसंघ चिरनेर, छत्रपती शिवाजी महाराज महिला ग्रामसंघ चिरनेर, शिव छावा महिला ग्रामसंघ चिरनेर यांच्या मधून 52 बचत गट मिळुन मदतीचा हात दिला आहे.
त्यांनी महाड मधील पूरग्रस्तांना प्रत्यक्ष भेट घेऊन तांदुळ १५० किलो, साखर ५० किलो, मुगडाळ ३० किलो, गव्हाचे पीठ १०० किलो, टोस्ट १०० पॅकेट, बिस्कीट ७०० पॅकेट, अंगाचे साबण १००, मच्छर अगरबत्ती १०० पॅकेट, मीठ १०० पॅकेट आदी जीवनावश्यक वस्तू देऊन मदतीचा हात दिला आहे.